वसईतील निवृत्त तहसिलदाराचा पालघरमध्ये गुढ मृत्यू

वसईतील निवृत्त तहसिलदाराचा पालघरमध्ये गुढ मृत्यू

वसईतील निवृत्त तहसिलदारांचा पालघरमधील निवासस्थानी पहाटे गोळ्या झाडलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्यामुळे त्यांच्या मृत्यूचे गूढ वाढले आहे. वसईत कार्यरत असलेले तहसिलदार पंढरीनाथ संखे निवृत्त झाले होते. त्यानंतर मनोर-मासवण येथील आपल्या बंगल्यात ते निवृत्तीचे दिवस जगत होते. पहाटे 4 वाजता उठून ते जॉगिंगला जाऊन सहा वाजता घरी परतायचे. बुधवारीही ते 6 वाजता घरी परतल्यानंतर साडेसहा वाजता त्यांच्या खोलीतून गोळ्या झाडल्याचा आवाज आला.त्यामुळे पत्नी आशा आणि आपल्या केबीनमध्ये असलेल्या सुरक्षारक्षक पारसने त्यांच्या खोलीत धाव घेतली. त्यावेळी संखे यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला.जवळच त्यांचे खासगी रिव्हॉल्वरही पडलेले दिसून आले.संखे यांना लागलीच जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र,ते तत्पूर्वीच मयत झाले होते.

चार गोळ्या डोक्यात लागून संखे मयत झाल्यामुळे पोलिसांनी अपघाती मृत्यूची सुरवातीला नोंद केली आहे.त्यांनी आत्महत्या केली असावी या दृष्टीने सुरवातीला तपास करण्यात येत होता. मात्र, त्यांचा घातपात करण्यात आल्याचा संशय नातलगांनी व्यक्त केल्यामुळे संखे यांच्या बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासाठी डीवीआर ताब्यात घेण्यात आला आहे. तसेच रिव्हॉल्वर फॉरेन्सिक लॅब आणि संखे यांचा मृतदेह जेजे हॉस्पिटलमध्ये विच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याचे पोलीस उपअधिक्षक विकास नाईक यांनी सांगितले.

First Published on: November 18, 2018 5:32 AM
Exit mobile version