घातपात की अपघात ? चौकशीनंतर समजेल

घातपात की अपघात ? चौकशीनंतर समजेल

सीरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीची चौकशी सुरू आहे. चौकशीनंतरच हा घातपात होता की अपघात होता हे कळेल. त्याआधी काहीही भाष्य करणे घाई ठरेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी सीरम इन्स्टिट्यूटमध्येजाऊन आगीची पाहणी केली. त्यांच्यासोबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार गिरीश बापट, उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे, अदर पुनावाला, सायरस पुनावाला यांनीही घटनास्थळाची पाहणी केली.

आग कशामुळे लागली?, किती नुकसान झाले? बीसीजी लसी सुरक्षित आहेत का? आदींची माहिती घेतानाच आगीतील मृत कामगारांविषयीची माहितीही मुख्यमंत्र्यांनी घेतली. त्यानंतर ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना कोरोनाच्या संकट काळात सीरम इन्स्टिट्यूट आशेचा किरण होती.

त्यामुळे सीरमला आग लागल्याचे कळताच काळजाचा ठोका चुकला. मात्र, सुदैवाने जिथे लस तयार केली जाते तिथे हा प्रकार घडला नाही. कोरोना लसीचा साठा पूर्णपणे सुरक्षित आहे, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

First Published on: January 23, 2021 5:00 AM
Exit mobile version