जे. जे रुग्णालयात रुग्णांना मिळणार हवाई सेवा

जे. जे रुग्णालयात रुग्णांना मिळणार हवाई सेवा

जे. जे. हॉस्पिटल

राज्य सरकारच्या सर्वात मोठ्या जे.जे. रुग्णालयात लवकरच हॅलिपॅडची सुविधा उपलब्ध होणार आहे. यामुळे रुग्णांना आपातकालीन परिस्थितीत देशाच्या कोणत्याही कोपऱ्यातून जे. जे रुग्णालयामध्ये दाखल करता येणार आहे. रुग्णांना तात्काळ आणि प्रभावी उपचार देण्यासाठी रुग्णालयाच्या १० मजल्यांच्या नवीन इमारतीत हॅलिपॅड तयार केले जाणार आहे.

एअर अॅम्ब्यूलन्सद्वारे थेट रुग्णालयात

जे. जे. समूह रुग्णालयाला सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या उभारणीला अखेरीस राज्य सरकारने मंजूरी दिली. याच नव्या इमारतीवर एअर अॅम्ब्युलन्स म्हणजे हेलिकॉप्टरची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या सुविधेमुळे रुग्णांना दर्जेदार उपचार देणे शक्य होईल. अन्य देशातून रुग्णांना ‘एअर अॅम्ब्युलन्स’ द्वारे रुग्णालयात आणून उपचार केले जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयाला सुपर -स्पेशालिटी बनवण्यासाठी ७ वर्षे जुन्या प्रस्तावाला मंजूरी मिळाली आहे. ९६३ रुपये खर्च करुन रुग्णालयाला राज्यातील सुपरस्पेशालिटी रुग्णालयांसारखं तयार केले जाणार आहे. यासाठी आधी १५० करोड रुपयांचा बजेट दिला जाणार आहे.

यासंदर्भात वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे अतिरिक्त संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितलं की, ” जे नवीन १० मजली रुग्णालय बांधलं जाणार आहे. त्याच्या १० व्या मजल्यावर हेलिकॉप्टरसाठी जागा तयार केली जाणार आहे. राज्यातून कुठूनही येणाऱ्या रुग्णांना याचा फायदा होणार आहे. आपातकालीन रुग्णांना हेलिपॅडमधून टाकून जे.जे रुग्णालयामध्ये आणल्यानंतर लिफ्टमधून थेट एकतर ऑपरेशन थिएटरमध्ये किंवा सीसीयूमध्ये दाखल केलं जाईल. त्यामुळे ही सुविधा उपलब्ध करून देणारं जे.जे. हे पहिलं रुग्णालय असणार आहे. ”

मे महिन्यात इमारतीच्या उभारणीला सुरुवात

तसंच, जे. जे. समूह रुग्णालयाच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या उभारणीला अखेरीस राज्य सरकारनं मंजूरी दिल्यानंतर येत्या १३ तारखेला निविदा प्रक्रियेचं काम करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी दोन महिन्यांचा अवधी लागणार आहे. ही निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर येत्या मे महिन्यात सुपरस्पेशालिस्टी नवीन इमारतीच्या उभारणीला सुरूवात होईल.

नव्या इमारतीत काय असणार सुविधा ?

नव्या इमारतीत सर्व प्रकारच्या सुविधा असणार आहेत. सर्व प्रकारच्या अवयवदानाची सुविधा असणार आहे. आता फक्ती किडनी दान करण्याची सोय आहे. पण, नव्या इमारतीत हृदय, यकृत, बोनमॅरोसह दुसरे अवयवदान केले जाऊ शकतील. याव्यतिरिक्त ४०५ अतिरिक्त डॉक्टर रुग्णालयासोबत जोडले जाणार आहेत. ११०० लोकांना तृतीय आणि चतुर्थ श्रेणीमध्ये रोजगार मिळणं सोपं होईल. ६० डे केअर बेड्स म्हणजे ज्यांना दिवसभर उपचारांची गरज असते. शिवाय, ब्लड ट्रांन्फ्यूजन सुविधा देखील उपलब्ध होणार आहे. एकूण २१ नवीन शस्त्रक्रियागृह तयार करणार. ‘एअर अॅम्ब्युलन्स रुग्णवाहिका’ सेवा सुरू करण्यात येणार आहेत.

First Published on: February 8, 2019 6:30 AM
Exit mobile version