Video: ‘अच्‍छे अच्‍छे न‍िकल गए, कौन याद रखता हैं भीडू’; जॅकीदादाची फिलॉसॉफी

Video: ‘अच्‍छे अच्‍छे न‍िकल गए, कौन याद रखता हैं भीडू’; जॅकीदादाची फिलॉसॉफी

अभिनेता जॅकी श्रॉफ

बॉलीवूडचे जॅकी ऊर्फ जग्गूदादा म्हणजे जॅकी श्रॉफ यांनी कठिण परिस्थितीवर मात आपले करिअर घडवले आहे. मात्र अजूनही ते त्यांच्या स्ट्रगलिंग काळातील दिवस विसरले नाहीत. याचा उल्लेख त्यांनी अनेकदा त्यांच्या मुलाखतीतून केला आहे. अत्यंत स्पष्टपणे आणि बिनधास आपली मतं मांडण्यासाठीही जॅकीदादाला ओळखले जोते. अशीच एक आयुष्याची फिलॉसॉफी त्यांनी मांडली आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. टिपिकल मुंबईच्या टपोरी भाषेतील ढंगाने जॅकी श्रॉफ यांनी ही फिलॉसॉफी त्यांच्या चाहत्यांना सांगितली आहे.

सिने अभिनेता आणि निर्माते विवेक रंजन अग्निहोत्री यांनी जॅकीदादाचा हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर देखील केला जात आहे. यासोबत त्यांनी, ‘मला नेहमीच जग्गूदादा मनापासून भावले आहेत. कारण ते पडद्यामागेही रिअल हिरो आहेत’, असे म्हणते त्यांच्या भाषेत लिहीले आहे की, ‘लाइफ होने का बस क्या भीडू, सब पॉसिबल है, बाकी सब क्या – जग्गू दादा’.

आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीकोन ठेवून बघायला हव. माणसं येतात आणि जातात. जीवन-मरण हे चक्र आहे. तू सुरूच राहतं. माझे आई-वडिल आणि भाई मला सोडून गेले. पण माझ्या आयुष्यात पत्नी, मुलगी कृष्णा आणि मुलगा टायगर हे आले. त्यांनी माझ्या माणसांची उणीव भरून काढली. उद्या मीही जाईन, तेव्हा दुसर कोणीतरी येईल. हे असंच आयुष्य असतं. त्यामुळे रडत आणि कुडत न बसता आयुष्याच्या या सत्याचा स्विकार करा आणि आनंदी रहा, असे जॅकी श्रॉफ यांनी या व्हिडिओत म्हटले आहे.

हेही वाचा –

CoronaVirus: टिकटॉक कंपनीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस केली मोठी मदत

First Published on: April 28, 2020 4:43 PM
Exit mobile version