दीड नारळाने केली कमाल, महापालिका बँकेच्या संचालक मंडळाची निवडणुक

दीड नारळाने केली कमाल, महापालिका बँकेच्या संचालक मंडळाची निवडणुक

दीड नारळाची कमाल

दि म्युनिसिपल को-ऑप बँक लिमिटेड बँकेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणुकीत जय सहकार पॅनेलने सर्वांचाच सुफडा साफ केला. सोमवारी झालेल्या या निवडणुकीतील मतदानानंतर याची मतमोजणी बुधवारी पार पडली. यामध्ये जय सहकार पॅनेलचे १४ उमेदवार निवडून आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा विष्णू घुमरे यांच्या जय सहकार पॅनेलने बँकेच्या संचालक मंडळावर आपले निर्विवाद वर्चस्व कायम राखले आहे. विशेष म्हणजे महिला गटातून निवडणूक लढवणाऱ्या वर्षा माळी यांनी सर्वांधिक मते मिळवली आहे. त्यांना तब्बल ९३०० मते मिळवत विजय संपादन केला आहे.

दि म्युनिसिपल को-ऑप बँक लिमिटेडच्या निवडणुकीत सहकार पॅनेल, जय सहकार पॅनेल, श्री शिव सहकार पॅनेल अशी तीन महत्वाच्या पॅनेलसह इतरही पॅनेल मोठ्या शक्तीनिशी रिंगणात उतरली होते. सध्या बँकेच्या संचालक मंडळावर जय सहकार पॅनेलचे वर्चस्व आहे. त्यामुळे या पॅनेलचा खाली खेचण्यासाठी सर्वच पॅनेलने आपली शक्ती पणाला लावली होती. या पॅनेलमधील बहुतांशी उमेदवार हे शिवसेनेचे असतानाही, त्यांच्यावर भाजपचा शिक्का मारून याविरोधात प्रति शिवसेनेचे पॅनेलही उभे करण्यात आले होते. परंतु या प्रतिशिवसेनेच्या श्री शिव सहकार पॅनेलचाही या पॅनेलने सुफडा साफ करून टाकला. या श्री शिव सहकार पॅनेलचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही. या संपूर्ण निवडणुकीवर आंगणेवाडीच्या जत्रेचे सावट होते. भराडी देवीची जत्रा आणि निवडणूक मतदान एकाच दिवशी असल्याने या मतदानावर परिणाम होण्याची दाट शक्यता वर्तवली जात होती. त्याचा परिणाम मतदान झाला. तसेच सुमारे ४ हजार मतदान बाद ठरले. त्यानंतरही जय सहकार पॅनेलने आपले जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणून बँकेच्या संचालक मंडळावर आपल्या पॅनेलचा झेंडा रोवतच सर्वच पॅनेलच्या उमेदवारांना नारळ दिला. विशेष म्हणजे सहकार पॅनेलचे जालिंदर चकोर हे चक्क काठावर पास व्हावे त्याप्रमाणे सर्वसाधारण गटांमध्ये ४३०८ मते मिळवत अगदी शेवटच्या जागेवर निवडून आले.

उमेदवार आणि त्यांना मिळालेली मते

— सर्वसाधारण गट—

१) घुमरे विष्णू गजाभाऊ : ६७६२

२) बनगर महावीर दाजीराम :६६१७

३) सावंत प्रदीप बाळकृष्ण : ५६७२

४) बोरीचा बिपीन अरविंद : ५७५५

५) मोहिते सहदेव विठ्ठल :५४३५

६) घुमरे मुकेश वसंत :५२०३

७) मोहिते अभिषेक प्रकाश :५१८५

८) बागुल अभिजित नारायण : ५०६१

९) जाधव संजय धोंडू : ४८७२

१०) १० दयाराम आडे : ४६६६

११) ११ भानुदास भोईर : ४५११

१२) पवार विलास दाजी : ४३५२

१३) किरण आव्हाड : ४३१८

१४) जालंदर चकोर : ४३०८

— अनुसूचित जाती-जमाती —

१) साळुंखे विलास कृष्णा :६५५१

— इतर मागास वर्ग

१) ठाकरे महेश गजानन:६१३९

— भटक्या जमाती

१) कराडे राजेंद्र सखाराम:६२९७

— महिला राखीव वर्ग

१)माळी वर्षा अजित: ९३००

२)डावरे रश्मी प्रकाश: ६०६५

First Published on: February 20, 2020 8:41 AM
Exit mobile version