‘नव्या पुण्याच्या शिल्पकारांनी‘ केलेला विकास रस्त्यावरून वाहतोय, जयंत पाटलांची टीका

‘नव्या पुण्याच्या शिल्पकारांनी‘ केलेला विकास रस्त्यावरून वाहतोय, जयंत पाटलांची टीका

मुंबई – ‘नव्या पुण्याच्या शिल्पकारांनी‘ पाच वर्ष पुण्याचा केलेला विकास पुण्याच्या रस्त्यावरून वाहत आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.

हेही वाचा – पुण्यात मुसळधार पावसाचं थैमान; दगडूशेठ मंदिरातही पाणीच पाणी

पुण्यासारख्या जागतिक पातळीवर महत्वाच्या असणाऱ्या शहरात असे चित्र निर्माण होणे हे अत्यंत दुर्दैवी आहे, असेही जयंत पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. पुणे शहरात अक्षरशः रस्त्यांच्या नद्या बनलेल्या आहेत. गेली २४ तास नागरिकांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. गेली पाच वर्ष पुणे महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे, असेही ट्विटमध्ये जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.


पुण्यात धुंवाँधार

पुण्यात रस्त्यावर जमा झालेल्या पावसाच्या पाण्यातून वाट काढताना पुणेकरांची दमछाक झाली. अनेक वाहनं ही पाण्यात अडकून पडली होती. याशिवाय सखल भागातही मोठ्याप्रमाण पाणी साचलं होतं, अनेक नागरिकांच्या घरातही पावसाचे पाणी शिरले. दरम्यान राज्यातील विविध भागात पावसानं धुडगूस घातला आहे. यामुळे नागरिकांना अनेक समस्या येत आहेत. यात पुण्यातील येवलेवाडी स्मशानभूमीजवळ, सुखसागर नगर, अंबामाता मंदिर, कोंढवा खुर्द, एनआयबीएम रोड, रास्ता पेठ, दारुवाला पुलाजवळ, सुखसागर नगर, डॉल्फिन चौक, बी टी कवडे रोड अग्निशमन केंद्र समोर, हडपसर, गाडीतळ अशा अनेक भागात पावसाचं पाणी शिरलं. त्यामुळे येथील नागरिकांना मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहे. विशेषत: या पावसामुळे वाहतुकीवर मोठ्याप्रमाणात परिणाम झाला. अलका टॉकीज परिसरातील रस्त्यांनाही नदीचे स्वरुप आले होते. यात अनेक दुचाकी वाहून गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. कोंढवा, हडपसरमध्येही रस्ते जलमय झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान या पावसाचा फटका महालक्ष्मी एक्सप्रेसलाही बसला आहे.

First Published on: October 18, 2022 10:58 AM
Exit mobile version