JEE, NEET च्या विद्यार्थ्यांना लोकल प्रवासाची मुभा

JEE, NEET च्या विद्यार्थ्यांना लोकल प्रवासाची मुभा

मुंबई उपनगरातील जेईई आणि नीटच्या विद्यार्थ्यांना उपनगरीय रेल्वेतून प्रवास करण्याची परवानगी द्या, अशी मागणी भाजप आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी केली होती. त्यानुसार राज्य शासनाने रेल्वेला प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाला केंद्रीय गृह मंत्रालयाने मान्यता दिली असून मंगळवारपासून सुरू होणार्‍या जेईई आणि नीट परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना लोकलमधून प्रवास करता येणार आहे.

जेईई परीक्षा १ ते ६ सप्टेंबर दरम्यान होणार आहे, तर नीट परीक्षाही १३ सप्टेंबरला होणार आहे. या दोन्ही परीक्षेत महाराष्ट्रातील २.२ लाख विद्यार्थी सहभागी होणार आहेत. यातील सर्वात जास्त विद्यार्थी मुंबई महानगर प्रदेशातील आहेत. सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांना उपनगरीय रेल्वेची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यानुसार या विद्यार्थ्यांना उपनगरीय रेल्वेतून त्यांच्या परीक्षा प्रवेश पत्रावर प्रवास करण्याची परवानगी देण्यात यावी अशी विनंती आमदार आशिष शेलार यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली होती. त्यावर रेल्वे मंत्र्याकडून सकारात्मकता दर्शवली आहे. त्यानुसार राज्य शासनाने रेल्वेला प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाला केंद्रीय गृह मंत्रालयाने मान्यता दिली असून मंगळवारपासून सुरू होणार्‍या जेईई आणि नीट परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना लोकलमधून प्रवास करता येणार आहे. या प्रस्तावामुळे मुंबई उपनगरातील सुमारे ५० हजार विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.

असा मिळणार विद्यार्थ्यांना प्रवेश

जेईई आणि नीट परीक्षा देणार्‍या उमेदवारांचे प्रवेशपत्र परीक्षेच्या दिवशी उपनगरी स्थानकांमध्ये प्रवेश करण्यासाठी आवश्यक असेल. स्थानकांवरील स्टेशन आणि सुरक्षा अधिकार्‍यांना परीक्षेच्या दिवशी विद्यार्थ्यांना परवानगी द्यावी यासाठी योग्य त्या सूचना रेल्वेकडून देण्यात आल्या आहेत. त्यांच्या सोयीसाठी महत्त्वपूर्ण रेल्वे स्थानकांवर अतिरिक्त बुकिंग काऊंटर सुरू केले जातील, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

First Published on: August 31, 2020 10:21 PM
Exit mobile version