‘या’ कारणामुळे जेट एअरवेजने केल्या १० विमानांच्या फेऱ्या रद्द

‘या’ कारणामुळे जेट एअरवेजने केल्या १० विमानांच्या फेऱ्या रद्द

प्रातिनिधिक फोटो

विमान वाहतूकमध्ये भारतात आघाडीवर असणाऱ्या कंपन्यांपैकी एक कंपनी जेट एअरवेजने आपल्या १० विमानांच्या फेऱ्या रद्द केल्या. रविवारी या फेऱ्या रद्द करण्यात आल्या. जेट एअरवेजने देशांतर्गत विमानांच्या फेऱ्या रद्द केल्या. तांत्रिक बिघाडामुळे या फेऱ्या रद्द केल्याचे सांगण्यात येत होते. मात्र या विमानांना पायलट उपलब्ध नसल्यामुळे या सेवा रद्द करण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. विमानांच्या फेऱ्या रद्द झाल्यामुळे अनेक प्रवाशांची गैरसोय झाली. या विमानांमध्ये काही कार्गो विमानही सामील होते. अशात प्रवाशांना विमानतळावर तात्काळत थांबावे लागले. अनेक प्रवाशांनी जेट एअरवेजच्या अधिकाऱ्यांना विमान रद्द झाल्याची कारणे विचारली मात्र तांत्रिक बिघाड असल्याचे त्यांनी कारण दिले. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी त्यांना SMS द्वारे सुचित करण्यात आले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

“तांत्रिक बिघाड असल्याने जेट एअरवेजने देशांतर्गत विमानाच्या फेऱ्या रद्द केल्या. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी त्यांना पूर्वीच माहिती देण्यात आली आहे. या प्रवाशांना दूसऱ्या विमानाने पाठवण्याची व्यवस्था केली जात आहे.”- जेट एअरवेज कर्मचारी 

भवितव्यावर प्रश्नचिन्ह

प्रवाशांना होणाऱ्या गैरसोईसाठी जेट एरअवेजने दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र विमान कंपनीत कार्यरत असलेले पायलट आणि अभियंत्यांना त्यांचे मानधन वेळेवर मिळत नसल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. जेट एअरवेजल अनेक वरिष्ठ कर्मचाऱ्यांनी राम राम ठोकला आहे. यामुळे कामाचा भार इतर पायलट्सवर पडला आहे. कामाच्या वेळेहून अधिक वेळ काम केल्यामुळे अखेर पायलेट्सनेही अधिक वेळ काम करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता जेट एअरवेजचे भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

First Published on: November 19, 2018 9:25 AM
Exit mobile version