Jet Airways : जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना 2 महिन्यांचा अंतरिम जामीन मंजूर

Jet Airways : जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना 2 महिन्यांचा अंतरिम जामीन मंजूर

मुंबई : जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना मोठा दिलासा मिळाला आहे. वैद्यकीय कारणात्सव नरेश गोयल यांना दोन महिन्यांचा अंतरिम जामीन मुंबई उच्च न्यायालयाने मंजूर केला आहे. जामीन मिळाला असला तरी, दोन महिन्यांच्या कालावधीत नरेश गोयल यांना मुंबईबाहेर जाण्यास मनाई आहे. नरेश गोयल यांना सप्टेंबरमध्ये ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती. तेव्हापासून ते तुरुंगात आहेत. (Jet Airways Founder Naresh Goyal Interim Bail For 2 Months Medical Grounds In Bombay High Court)

कॅनरा बँकेचे कर्ज बुडवल्याप्रकरणी नरेश गोयल यांच्यावर ईडीने कारवाई केली होती. 1 सप्टेंबरला ईडीकडून त्यांना अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ते तुरुंगात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नरेश गोयल यांना काही दिवसांपूर्वी कर्करोगाचे निदान झाले होते. त्यानंतर 3 मे रोजी झालेल्या सुनावणीवेळी नरेश गोयल यांच्या वकिलांनी न्यायालयाकडे वैद्यकीय कारणास्तव अंतरिम जामीन मागितला होता. मात्र, ईडीने त्यांना जामीन देण्यास विरोध केला होता. तसेच, विशेष न्यायालयानेही त्यांना जामीन देण्यास नकार दिला होता.

दरम्यान, जामीनापूर्वी नरेश गोयल यांनी विशेष न्यायालयासमोर प्रतिक्रिया दिली. जीवनाची आशा संपली असून सध्याच्या स्थितीत जगण्यापेक्षा तुरुंगात मरणे चांगले आहे. नियतीने जे लिहून ठेवले आहे, त्याला सामोरे जाण्यास तयार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. शिवाय, आपली पत्नी आजारी असून तिची काळजी घेण्यासाठी कोणीही नाही. 74 वर्षीय गोयल यांच्या पत्नी अनीता यांनाही कर्करोगाचे निदान झाले आहे. त्या सध्या उपचार घेत आहेत, अशीही प्रतिक्रिया त्यांनी दिली.

कॅनरा बँकेचे कर्ज बुडवल्याप्रकरणी ईडीने गेल्या वर्षी नरेश गोयल यांना अटक केल्यानंतर तेव्हापासून ते आर्थर रोड तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहेत. आता मुंबई उच्च न्यायालयाने दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर केला आहे.


हेही वाचा – Mumbai Local: तीन प्रवाशांच्या मृत्यूनंतर रेल्वे प्रशासनाला जाग; गर्दी नियंत्रणासाठी बोर्डाला पत्र

Edited By – Vaibhav Patil

First Published on: May 6, 2024 8:19 PM
Exit mobile version