जिग्नेश ठक्कर हत्येप्रकरणी तिघांना अटक, मुख्य आरोपी अद्याप फरार

जिग्नेश ठक्कर हत्येप्रकरणी तिघांना अटक, मुख्य आरोपी अद्याप फरार

प्रातिनिधिक फोटो

बांधकाम साहित्य पुरवठादार जिग्नेश ठक्कर उर्फ मुनिया हत्याप्रकरणात महात्मा ज्योतिबा फुले चौक पोलिसांकडून तीन जणांना अटक करण्यात आलेली आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी धर्मेश शहा हा अद्याप फरार असून त्याचा कसून शोध घेण्यात येत आहे. जिग्नेश ठक्कर हत्याप्रकरणात आणखी काही जणांचा समावेश असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून त्यांना देखील चौकशीसाठी बोलावण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

बांधकाम साहित्य पुरवठादार जिग्नेश ठक्कर उर्फ मुनिया याची शुक्रवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती ही हत्या त्याचा बालपणाचा मित्र धर्मेश शहा आणि धर्मेशचा अंगरक्षक जयपाल उर्फ जापान याने केली होती. व्यवसायिक आणि आर्थिक वादातून हि हत्या करण्यात आलेली होती. या प्रकरणात ठाणे खंडणी विरोधी पथकाने काही दिवसापूर्वी अहमदाबाद येथून जयपाल उर्फ जपान याला ताब्यात घेतले होते. तसेच बुधवारी धर्मेशचा भाऊ धनराज उर्फ मुन्ना याला सुरत येथून ताब्यात घेण्यात आले.

खंडणी विरोधी पथकाने या दोघांचा ताबा महात्मा ज्योतिबा फुले चौक पोलिसांकडे देण्यात आला असून महात्मा ज्योतिबा फुले पोलिसांनी या हत्यांच्या गुन्ह्यात अमजद पठाण नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. खंडणी विरोधी पथकाने ताब्यात देण्यात आलेले दोघे आणि अमजद पठाण या तिघांना अटक कऱण्यात आलेली असून या गुन्ह्यातील मुख्य आरोपी धर्मेश हा अद्याप फरार असून त्याचा कसून शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान या गुन्हयात आणखी काही जणांचा समावेश असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून त्यांना देखील चौकशीसाठी लवकरच ताब्यात घेण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. मृत जिग्नेश आणि धर्मेश हे दोघे अट्टल गुन्हेगार असून दोघांवर अनेक गंभीर गुन्ह्याची नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. या दोघांत व्यवसायिक तसेच आर्थिक वाद होता. या वादातून तसेच व्यवसायिक वर्चस्वातून ही हत्या झाल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आलेले आहे.

First Published on: August 6, 2020 7:32 PM
Exit mobile version