रात्री उशिरा जितेंद्र आव्हाड रुग्णालयात दाखल!

रात्री उशिरा जितेंद्र आव्हाड रुग्णालयात दाखल!

कोरोनाची पहिली टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर देखील सुरक्षेचा उपाय म्हणून १४ दिवस होम क्वॉरंटाईन झालेले राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना मंगळवारी रात्री उशिरा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ठाण्याच्या प्रसिद्ध ज्युपिटर रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं आहे. त्यांची ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्यामुळे ते अॅडमिट झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या परिवाराव्यतिरिक्त त्यांच्या बंगल्यावरील कर्मचारी वर्ग आणि आव्हाड यांचे सुरक्षारक्षक अशा एकूण १४ जणांची कोरोना टेस्ट मागच्याच आठवड्यात पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे त्या सगळ्यांना क्वॉरंटाईन करण्यात आलं आहे. तसेच, ठाण्यातल्या काही पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना देखील कोरोनाची लागण झाल्यामुळे हा भाग संवेदनशील झाला आहे. त्यातच आव्हाड यांना रात्री उशिरा अचानक रुग्णालयात दाखल केल्यामुळे त्यावर तर्क-वितर्क लढवले जाऊ लागले होते. मात्र, ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्यामुळेच त्यांना अॅडमिट करण्यात आल्याची माहिती आता मिळत आहे.

First Published on: April 22, 2020 8:21 AM
Exit mobile version