धक्कादायक! अजून एका अभिनेत्याची गळफास लावून आत्महत्या

धक्कादायक! अजून एका अभिनेत्याची गळफास लावून आत्महत्या

छोट्या पडद्यावरील कलाकार अभिनेता समीर शर्मा याने आत्महत्या केल्याची खळबळजनक बातमी समोर येत आहे. अभिनेता समीर शर्मा याचा मृतदेह मुंबईतील मालाड येथील त्याच्या घरामध्ये पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. टीव्हीवरील लोकप्रिय डेली सोप कहानी घर घर की, मध्ये समीर शर्माला प्रेक्षकांनी पाहिले आहे. बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर अशाच पद्धतीने आणखी एका कलाकाराने आपले जीवन संपवले असल्याचे मनोरंजन क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

First Published on: August 6, 2020 1:06 PM
Exit mobile version