कल्याण-डोंबिवली नवीन ८ कोरोना रूग्ण; रूग्णसंख्या १३७वर

कल्याण-डोंबिवली नवीन ८ कोरोना रूग्ण; रूग्णसंख्या १३७वर

कल्याण- डोंबिवलीत सोमवारी नवीन आठ रूग्ण आढळून आले, त्यामुळे कोरोनाबाधित रूग्णांची संख्या १३७ झाली आहे. आतापर्यंत ३ मृत्यू असून ४५ जणांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. त्यामुळे उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या ८९ आहे. नवीन आढळलेल्या रूग्णात मोहने परिसरातील एका सात वर्षीय मुलीचाही समावेश आहे तसेच डोंबिवली पूर्वेतील ३८ वर्षीय व्यक्ती ही मुंबई येथील शासकीय परिवहनचा ड्रायव्हर आहे तर कल्याण पश्चिमेतील २१ वर्षीय तरूण हा मुंबई येथील खासगी बँकेचा कर्मचारी आहे. कल्याण पूर्वेतील ३४ वर्षीय व्यक्ती मुंबईतील खासगी रूग्णालयातील कर्मचारी आहे. डोंबिवली पश्चिमेतील ४० वर्षीय महिला ही खासगी रूग्णालयातील नर्स आहे. उर्वरित कोरोनाबाधित रूग्णाच्या निकट सहवासातील आहेत. आतापर्यंत ४९९८ रूग्णांना होम क्वारंटाईन केलेले असून ९६ रूग्ण इन्स्टिट्यूशनला  क्वारंटाईनमध्ये आहेत.

रुग्णांची आकडेवारी 

कल्याण पूर्व  २८

कल्याण पश्चिम १६

डोंबिवली पूर्व  ४८

डेांबिवली पश्चिम  ३५

मांडा टिटवाळा ५

 मोहने  ५

First Published on: April 27, 2020 6:58 PM
Exit mobile version