कल्याण डोंबिवलीत चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच दिवशी दोन घरफोड्या

कल्याण डोंबिवलीत चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच दिवशी दोन घरफोड्या

डोंबिवलीत पावणे चार लाखाची घरफोडी झाल्याची घटना ताजी असतानाच कल्याण येथे सोमवारी एकाच दिवशी दोन घरफोड् करण्यात आल्याची घटना घडली आहे. चोरटयांनी लाखोंचा मुद्देमाल लंपास केला आहे. कल्याण डोंबिवली शहरात वाढत्या घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. पोलीस निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्यानेच घरफोडीचे प्रकार वाढल्याचे बोलले जात आहे.

२ लाखाचा मुद्देमाल लंपास

डोंबिवली पूर्वेतील पांडूरंग बिल्डींगमध्ये राहणारे सुनील पारेख यांच्या बंद घराचा कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरटयांनी घरातील कपाटातून सोन्याची चैन, सहा अंगडया, सोन्याच्या पाटल्या ब्रेसलेट ५० हजार रूपये रोकड असा एकूण २ लाख २३ हजार ९०० रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर कल्याणातील कोळसेवाडी परिसरात रहाणारे दिंगबर आवाड हे सकाळच्या सुमारास तळघरात योगा करीत असतानाच चोरटयांनी घरात घुसून सुमारे १ लाख रूपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या काळात बंदोबस्तासाठी अनेक पोलीस कामाला लावण्यात आहे. त्यामुळे पोलीस ठाण्यात पोलीस बळ अपुरे आहे. त्याचाच फायदा चोरटयांनी घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मध्यरात्रीच्या सुमारास पोलीसांची गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


वाचा – निवृत्त पोलिस अधिकाऱ्याच्या घरी घरफोडी

वाचा – माजी महापौर पांडेंच्या फार्म हाऊसमध्ये घरफोडी


 

First Published on: April 22, 2019 3:08 PM
Exit mobile version