Video: मोदींच्या स्वागताला ‘गाजराचे तोरण’

Video: मोदींच्या स्वागताला ‘गाजराचे तोरण’
 चक्क ‘गाजराचे तोरण’ बांधले होते. कल्याण रेल्वे स्थानकाच्या ब्रीजवर नागरिकांनी हे गाजराचं तोरण बांधत मोदी सरकारला चांगलाच टोला हाणल्याची चर्चा रंगते आहे. गाजराच्या तोरणासोबतच काळे झेंडे बांधत कल्याणवासीयांनी पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याची चांगलीच खिल्ली उडवल्याचं बोललं जात आहे. सध्या सोशल मीडियावर या गाजराच्या तोरणाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.


कल्याण पूर्वमधील नागरिकांनी हे गाजराचे तोरण लावून ‘जागो फडणवीस, मोदी सरकार’, अशी घोषणाबाजीही केली. गाजराचे तोरण, हे भारताच्या प्रधान सेवकाचं लक्ष वेधण्यासाठी असून, आम्ही जे केलं ते योग्यच केलं अशी भूमिका यावेळी लोकांनी घेतली. कल्याण पूर्वमध्ये आज पाणी, रस्ते, बांधकामाशी निगडीत अनेक समस्या स्थानिकांना भेडसावत आहेत.

उद्घाटनाच्या कार्यक्रमादरम्यान बोलतेवेळी, ‘येत्या काही वर्षांमध्ये मुंबईचा देखील अजून विस्तार होणार आहे. त्यासाठी आम्ही इथल्या सोयी सुविधांकडे लक्ष दिलं आहे,’ असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. यावेळी मोदी म्हणाले री, २०२२ मध्ये एकट्या मुंबईत तब्बल २७५ किलोमीटरची मेट्रो सुरू होईल. या मेट्रोमुळे पूर्ण मुंबईतल्या ट्रॅफिकच्या समस्येवर उपाय शोधला जाईल. ‘२०३५ सालचं लक्ष्य ठेऊन हे प्रकल्प केले जात आहेत’, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

 

First Published on: December 18, 2018 5:25 PM
Exit mobile version