धावत्या ट्रेनमधून उतरताना तोल गेलेल्या प्रवाशाचे रेल्वे पोलिसांनी वाचवले प्राण

धावत्या ट्रेनमधून उतरताना तोल गेलेल्या प्रवाशाचे रेल्वे पोलिसांनी वाचवले प्राण

आज धावत्या ट्रेनमधून उतरणाऱ्या प्रवाशाचा तोल गेल्याने रेल्वेखाली जाणाऱ्या प्रवाशाचे प्राण रेल्वे पोलिसांनी वाचवले. ही घटना कल्याण रेल्वे स्थानकात घडली असून हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या घटनेत दिलीप मांडगे यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

५२ वर्षीय दिलीप मांडगे हे आपल्या मुलासह कामायनी एक्स्प्रेसने प्रवास करणार होते. मात्र चुकून पवन एक्स्प्रेसमध्ये चढले. आपण चुकीच्या ट्रेनमध्ये चढल्याचे मांडगे यांच्या लक्षात येताच चालू ट्रेनमध्ये स्टेशनवर उतरले. मात्र चालत्या ट्रेनमधून उतरताना दिलीप मांडगे यांचा तोल जाऊन ते खाली पडले. यावेळी त्या ठिकाणी तैनात असलेल्या महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सचे जवान सोमनाथ महाजन आणि आर.पी.एफ. च्या के. साहू या महिला कर्मचाऱ्याने समय सूचकता दाखवत मांडगे यांना पकडत रेल्वे ट्रॅकखाली जाण्यापासून वाचविले. या घटनेत प्रवासी दिलीप मांडगे यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. तर मांडगे यांनी समय सूचकता दाखवून त्यांचे प्राण वाचविणाऱ्या या रेल्वे पोलिसांचे त्यांनी आभार मानले आहेत.

 

First Published on: July 28, 2020 11:28 PM
Exit mobile version