रेल्वे पोलिसाचा प्रामाणिकपणा

रेल्वे पोलिसाचा प्रामाणिकपणा

रेल्वे पोलिसाचा प्रामाणिकपणा

समाजात अजूनही प्रामाणिकपणा शिल्लक असल्याचे समोर आले आहे. लोकलमध्ये विसरलेल्या लॅपटॉपच्या बॅटऱ्यांची पिशवी प्रामाणिकपणे रेल्वे पोलिसांनी मालकाला परत केली आहे. रघुनाथ रणधिरे असे या रेल्वे पोलिसाचे नाव आहे. मालकाला हजारो रुपयांच्या बॅटऱ्या परत मिळाल्याने मालकांनी देखील सुटकेचा निश्वास सोडला आहे.

नेमके काय घडले?

खोपोली येथे राहणारे केतन म्हात्रे यांचा इलेक्ट्रॉनिकचे सुटे भाग विकण्याचा व्यवसाया आहे. १३ डिसेंबर रोजी ते छत्रपटी शिवाजी महाराज टर्मिनस येथून कल्याणच्या दिशेने निघाले होते. केतन यांना डोंबिवली येथे काही दुकानात इलेक्ट्रॉनिकचे सुटे भाग द्यायचे होते. त्यांच्यासोबत इलेक्ट्रॉनिकच्या तीन ते चार बॅगा होत्या. त्यामुळे ते एक बॅग घेण्यास विसरले आणि ते लोकलमधून उतरले. केतन म्हात्रे हे उतरुन गेल्यानंतर देखील आपण इलेक्ट्रॉनिकचे सुटे भाग असलेली बॅग विसल्याचे त्यांच्या लक्षात देखील आले नाही.

रेल्वे पोलीस रघुनाथ रणधिरे यांनी बॅग पाहिली

लोकल कल्याण स्थानकाच्या फलाट क्रमांक २ वर पोहोचली. लोकल स्थानकावर पोहोचल्यानंतर रघुनाथ रणधिरे यांनी लोकलमध्ये कोणाची तरी बॅग राहिल्याचे पाहिले. त्या पिशवीमध्ये महागड्या लॅपटॉपच्या बॅटऱ्या होत्या. पिशवीतील एका बिलावरुन त्यांनी म्हात्रे यांचा फोन नंबर मिळवळा आणि त्यांच्याशी संपर्क साधला. कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात महिला पोलीस निरीक्षक मेढे यांच्या उपस्थितीत त्यांना हरवलेल्या वस्तू पुन्हा परत केल्या आहेत. रणधिरे यांच्या कामगिरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनकर पिंगळे यांनी त्यांचे कौतुक केले आहे.


वाचा – रिक्षाचालकाने परत केले प्रवाशाचे पैसै


 

First Published on: December 19, 2018 4:56 PM
Exit mobile version