‘यावेळी मी वाचले; मुंबईत दहशत माजवणाऱ्या प्रशासनाचाच बोलबाला…’; कंगनाचा पुन्हा सेनेवर निशाणा

‘यावेळी मी वाचले; मुंबईत दहशत माजवणाऱ्या प्रशासनाचाच बोलबाला…’; कंगनाचा पुन्हा सेनेवर निशाणा

शिवसेना आणि बॉलिवूड क्वीन अभिनेत्री कंगणा रानावत यांच्यातील ट्विटवार अद्याप सुरूच आहे. काल राज्यपालांची भेट घेतल्यानंतर आज अभिनेत्री कंगना राणावत मुंबईहून मनालीला रवाना झाली. दरम्यान, चंदीगड येथे पोहोचताच कंगनाने एक ट्विट करून शिवसेनेवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. शिवसेनेची सोनिया सेना झाल्याने, मुंबई पूर्वीप्रमाणे सुरक्षित राहिलेली नाही, असे कंगनाने ट्विट करत म्हटले आहे.

असं म्हणाली कंगना…

“चंदीगडमध्ये उतरताच माझी सुरक्षा नाममात्र राहिले आहे. लोक आनंदाने अभिनंदन करत आहेत. असे वाटते, यावेळी मी वाचले. एक दिवस होता, जेव्हा मुंबईत आईच्या कुशीतली उबदारता जानवत होती. आज असा दिवस आहे, जीव वाचला म्हणजे लाखो मिळवले. शिवसेनेची सोनिया सेना होताच मुंबईत दहशतमाजवणाऱ्या प्रशासनाचाच बोल बाला आहे.” असे कंगनाने या केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, ठाकरे सरकार आणि अभिनेत्री कंगना यांच्यातील वाद अद्यापही थांबल्याचे दिसत नाही. यासंदर्भात रविवारी सायंकाळी कंगनाने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचीही भेट घेतली. यापूर्वी मुंबईत आपल्याला असुरक्षित वाटत आहे. तसेच येथे आपल्याला वारंवार धमक्या दिल्या जात आहेत, असा आरोपही कंगनाने केला आहे.

मुंबईतून निघताना कंगनाने केले असे ट्विट 

कंगनाने ट्विटमध्ये म्हटले आहे की, जब रक्षक ही भक्षक होने का एलान कर रहे हैं धडियाल बन लोकतंत्र का चीरहरण कर रहे हैं, मुझे कमजोर समझ कर, बहुत बडी भूल कर रहे हैं! एक महिला को डरा कर उसे नीचा दिखाकर, अपनी इमेज को धूल कर रहे हैं!! या शेरोशायरीतून कंगनाने, महाराष्ट्र सरकारवर लोकशाहीचे वस्त्रहरण केल्याचा आरोप केला आहे. तसेच मला कमकुवत समजण्याची मोठी चूक केली. एका महिलेला घाबरवत तिच्यावर अन्याय करत स्वत:ची प्रतिमा मलीन करत असल्याचेही कंनाने म्हटले आहे.


‘रक्षक झाले भक्षक’ जड अंत:करणाने मुंबई सोडून जात आहे, कंगनाचा टोला!
First Published on: September 14, 2020 4:54 PM
Exit mobile version