आज माझे घर तुटले उद्या तुमचे गर्वहरण होईल

आज माझे घर तुटले उद्या तुमचे गर्वहरण होईल

Kangana Ranaut Controversy: स्वातंत्र्याबाबत कंगनाचे वादग्रस्त वक्तव्य, पद्मश्री काढून घेण्याची राजकीय पक्षांची मागणी

मुंबईत पोहोचताच अभिनेत्री कंगना रानौत हिने ट्विटरला व्हिडिओ शेअर करत मुंबई महापालिकेकडून करण्यात आलेल्या कारवाईवर संताप व्यक्तकेला आहे. उद्धव ठाकरे ‘आज तुम्ही माझे घर तोडले आहे, उद्या तुमचे गर्वहरण होईल,’ असे कंगनाने व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

महत्त्वाचे म्हणजे कंगनाने पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख केला आहे. कंगनाने मुंबईतील परिस्थिती पाकिस्तानव्याप्त काश्मीरप्रमाणे असल्यासारखे म्हटल्याने टीका झाली होती. यानंतर निर्माण झालेल्या वादानंतर कंगनाने आपल्याला मुंबईत पुन्हा येऊ नको अशा धमक्या दिल्या जात आहेत, असे सांगितले होते. तसेच आपण ९ तारखेला मुंबईत येत असून कोणच्या बापामध्ये हिंमत असेल तर रोखून दाखवा, असे आवाहनही दिले होते. यानंतर बुधवारी कंगना मुंबईत पोहोचली.

मुंबईत पोहोचताच कंगनाने व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात तिने म्हटले आहे की, उद्धव ठाकरे तुम्हाला काय वाटते, फिल्म माफियांसोबत मिळून माझे घर तोडून तुम्ही बदला घेतला आहे. आज माझे घर तुटले आहे, उद्या तुमचे गर्वहरण होईल. हे वेळेचे चक्र आहे, नेहमी सारखे राहत नाही हे लक्षात ठेवा.

पण तुम्ही माझ्यावर उपकार केले आहेत. काश्मिरी पंडितांना कसे वाटते हे मला आज कळाले. आज मी या देशाला वचन देते की, मी फक्त अयोध्या नाही तर काश्मीरवरही चित्रपट तयार करणार. आपल्या देशवासीयांना जागरुक करणार. ही क्रूरता आणि दहशतवाद माझ्यासोबत झाला हे चांगलं आहे. कारण याचा काही अर्थ आहे. जय हिंद,जय महाराष्ट्र.

आज कंगनाविरोधात भारतीय कामगार सेनेचे कर्मचारी एअरपोर्टवर आंदोलन करत होते. मोजून 67 जण होते. आमच्या लोकांनी मोजले. मुंबईत मराठी माणूस फक्त 30 टक्के उरला. एकही मतदारसंघ मराठी माणसाच्या जीवावर निवडून येऊ शकत नाही. कंगना जर मुंबई महाराष्ट्राचा अपमान करत असेल तर कायद्यात तरतूद आहे, कारवाई करा. मुख्यमंत्री मातोश्रीच्या पिंजर्‍यात कशाला बसला आहे. कंगना मुंबईत आली, घरी गेली, प्रतिक्रिया दिली आणि शिवसेनेचे नाक कापले. शिवसेना खासदार संजय राऊतला नाक तरी आहे का?
-नारायण राणे, खासदार, भाजप.

First Published on: September 10, 2020 7:12 AM
Exit mobile version