”आता तर मी फाटके कपडे घालणारच” कटप्पाच्या लेकीची संतापजनक प्रतिक्रिया

”आता तर मी फाटके कपडे घालणारच” कटप्पाच्या लेकीची संतापजनक प्रतिक्रिया

उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी महिलांना संस्काराबाबत उद्देशून केलेल्या वक्तव्यामुळे चांगलाच वाद निर्माण झाला होता. आजकाल महिला फाटलेल्या जीन्स घालून फिरतात, हे बरोबर आहे का? हे कसले संस्कार आहेत? असे रावत म्हणाले होते. महिलांच्या फाटक्या जीन्सबाबत त्यांनी केलेल्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटले. यातच आता दक्षिणात्या कलाकारांनीही यावर नाराजी व्यक्त केली आहे. बाहुबली फेम कटप्पा अर्थात अभिनेता सत्यराज यांची मुलगी दिव्या सत्यराज हीने सुद्धा या वादात एन्ट्री घेतली आहे. दिव्याने तीरथ सिंह रावत यांच्या वक्तव्यावर संपाजनक प्रतिक्रिया दिली आहे. आता तर मी फाटके कपडे घालणारच, तुम्हाला जे करायचंय ते करा अशा शब्दात तिने तीरथ सिंह यांना प्रतिउत्तर दिले आहे. या मुद्यावर दिव्याने तिच्या सोशल मीडियावर एक तिचा एक फोटो शेअर करत स्टेमेंट केली आहे.

 


हे वाचा- ‘ओटीटी’मध्ये झालेली वाढ तात्पुरती?

First Published on: March 21, 2021 3:35 PM
Exit mobile version