चोरट्याचा केईएम हॉस्पिटलच्या तिजोरीवर डल्ला

चोरट्याचा केईएम हॉस्पिटलच्या तिजोरीवर डल्ला

theft

केईएम हॉस्पिटलमधून रुग्णाच्या नातेवाईकाचे वस्तू चोरणार्‍या चोरट्यांंनी थेट हॉस्पिटलच्याच तिजोरीत हात घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आले आहे. रुग्नांच्या नातेवाईकांनी जमा हॉस्पिटलकडे जमा केलेल्या रोकडमधून ५० हजार रुपयाची रोकड चोरीला गेली आहे. या प्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला असून या चोरट्याचा शोधासाठी पोलीस हॉस्पिटल आवारातील सीसीटीव्हीची मदत घेत आहे.

परळ येथील केईएम हॉस्पिटलमध्ये रुग्नाच्या उपचारासाठी लागणारी रक्कम नातेवाईकांकडून हॉस्पिटलच्या संबंधित विभागात भरण्यात येते, ती रक्कम एकत्र करून ती रक्कम लेखाधिकारी यांच्याकडे जमा केली जाते. २८ जून रोजी दुपारी लेखाधिकारी यांनी रोख विभागाचे अधीकारी जालंदर चकोर यांना कळवले कि, त्यांच्याकडे खिडकी क्रमांक ३७ आणि ५६ येथून कर्मचार्‍याने ४ लाख १६ हजार ३३० रुपये जमा केली होती.

त्यावेळी नोटांचे वर्गवारी करीत असताना त्यात ५० हजार रुपये कमी असल्याचे आढळून आले. हि रक्कम कोणी चोरली याबाबत लेखाधिकारी याना काहीच माहित नसल्याचे त्यांनी रोख विभागाचे अधिकारी चकोर याना सांगीतले. हि रक्कम रोखविभागाच्या खोलीतून अज्ञात चोरट्याने चोरल्याचे लक्षात येताच रोख अधिकारी जालंदर चकोर यांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दाखल केली.

भोईवाडा पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याच्या शोधासाठी हॉस्पिटलच्या आवारातील सीसीटीव्हीचे फुटेज तपासण्यात येत असल्याची माहिती भोईवाडा पोलीस ठाण्याचे वपोनि. रामचंद्र जाधव यांनी दिली. याबाबत संबंधित विभागातील कर्मचार्‍याकडे चौकशी सुरु असून लवकरच हॉस्पिटलची रोकड चोरणारा पोलिसांना मिळून येईल, असे पोलिसांनी सांगितले.

First Published on: July 2, 2019 4:12 AM
Exit mobile version