केईएम रुग्णालयातील बेपत्ता निवासी डॉक्टर हिमाचलमध्ये  

केईएम रुग्णालयातील बेपत्ता निवासी डॉक्टर हिमाचलमध्ये  

डॉ. अजिंक्य मौर्य

परळच्या केईएम रुग्णालयातून सोमवारी संध्याकाळी गायब झालेले डॉ. अजिंक्य मौर्य यांचा अजूनही पत्ता लागलेला नाही. पण, डॉ. अजिंक्य यांचे वडील योगेंद्र सिंह यांनी ‘माय महानगर’शी बोलताना दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितलं की, तो ट्रेस होत असून तो सध्या मित्राकडे हिमाचलमध्ये गेलेला आहे, असं आम्हाला कळालं आहे. २४ वर्षीय निवासी डॉक्टर सोमवारी संध्याकाळपासून बेपत्ता झाल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी समोर आली होती. त्यानंतर मंगळवारी बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या आई-वडिलांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात दाखल केली. पण, अजिंक्य यांच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, ते सध्या हिमाचलमध्ये त्या मित्राच्या घरी असल्याचं ‘माय महानगर’शी बोलताना सांगितलं आहे.  

सोमवारी संध्याकाळी झाले बेपत्ता-

डॉ. अजिंक्य केईएमच्याच मुलांच्या हॉस्टेलमध्ये राहण्यास आहेत. दोन दिवसांपूर्वी अजिंक्य मेडिटेशन करत होते. संध्याकाळी त्यांनी मित्राला मला जावं लागेल एवढंच सांगितलं आणि ते हॉस्टेलबाहेर पडले. दोन दिवस झाले तरी अजिंक्य यांची माहिती मिळालेली नाही. ते मोबाइल, पाकीट, आणि इतर साहित्यही हॉस्टेलमध्येच सोडून गेले. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा संपर्क अजूनही त्यांच्याशी संपर्क झालेला नाही. संध्याकाळी बाहेर पडलेले डॉ. अजिंक्य मोर्य रात्री उशिरा परतल्याने त्याच्यासोबतच्या इतर डॉक्टरांनी ही त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला. पण, अजिंक्य सापडले नाहीत. पण, आता ते हिमाचलमध्ये असल्याचं सांगण्यात आलं आहे. 

डॉक्टरचा अखेर ठावठिकाणा लागला

याविषयी केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी ‘माय महानगर’शी बोलताना सांगितलं की, डॉ. अजिंक्य ट्रेस झाल्याचं त्यांच्या वडिलांनी सांगितलं आहे. शिवाय, जिथे ही आहेत ते सुखरुप असल्याचं ही वडिलांनी आम्हाला सांगितलं आहे. पण, अजूनही डिटेल्स आमच्याकडे आलेले नसल्याने याबद्दल आता काही सांगता येणार नाही.
First Published on: August 3, 2018 6:08 PM
Exit mobile version