ठाकरे सरकार बनवाबनवी करतंय; किरीट सोमय्यांची टीका

ठाकरे सरकार बनवाबनवी करतंय; किरीट सोमय्यांची टीका

मेट्रो कारशेडला स्थगिती दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक समिती नेमल्याने आता भाजप कडून ठाकरे सरकारवर जोरदार टीका होऊ लागली आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी तर ठाकरे सरकारची बनवा बनवी सुरू असल्याचा आरोप केला आहे.

शिवसेना महाआघाडी सरकारने सत्तेवर आल्या बरोबर आरे मेट्रो कारशेडला स्थगिती दिली आणि आता तर त्यांनी एक समिती देखील नेमली. याबाबत शासन निर्णयही काढण्यात आला आहे. “मेट्रो कारशेड करीता सद्यस्थितीत निश्चित जागेत पर्यावरण समतोल करण्यासाठी उपाय सुचविणे, तसेच सद्य परिस्थितीत वेळेत काम पूर्ण करण्यासाठी उपाय योजना करणे आणि वाजवी किमतीत अन्य पर्याय असल्यास सुचविणे” असे नव्या शासन निर्णयात म्हटले आहे.

त्यामुळे या समितीचे काम आणि कार्यकक्षा वाचल्या नंतर लक्ष्यात येते की “कारशेडची बनवा बनवी” असे सोमय्या यांनी टीका केली आहे. तसेच हे सगळे आधीच्या सरकारने केले आहे. कोर्टानेही विकल्प नाही मान्य केले होते. मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही स्थगिती का दिली? असा सवाल उपस्थित करत हा टाईम पास का? असा सवालही सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.

First Published on: December 13, 2019 12:19 PM
Exit mobile version