उपोषणानंतर मिळाली १९ बंगल्यांच्या घोटाळा प्रकरणाची कागदपत्रं, किरीट सोमय्यांचा दावा

उपोषणानंतर मिळाली १९ बंगल्यांच्या घोटाळा प्रकरणाची कागदपत्रं, किरीट सोमय्यांचा दावा

उध्दव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि रवींद्र वायकर यांच्या पत्नीच्या नावे रायगड जिल्ह्यातील अलिबागमधील कोर्लई गावात १९ अनधिकृत बंगले असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. हे प्रकरण किरीट सोमय्यांनी चांगलंच उलचून धरलंय. काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांनी सोमवारी कोर्लई गावाला भेट दिली होती. मात्र त्यावेळी किरीट सोमय्यांना गावकऱ्यांच्या विरोधामुळे रिकाम्या हातानेच परतावं लागलं होतं. त्यानंतर आता किरीट सोमय्यांनी हे प्रकरण आणखी उकरून काढण्यासाठी थेट मंत्रालय गाठलंय. या ठिकाणी किरीट सोमय्यांनी उपोषणाचं हत्यार उपसलं असून मूक आंदोलन सुरू केलंय.

मंत्रालयातील पहिल्या मजल्यावर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं कार्यालय आहे. या कार्यालयाबाहेर खाली बसून किरीट सोमय्यांनीही हे मूक आंदोलन सुरू केलंय. रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील कोर्लई गावात ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावाने १९ बंगले अधिकृतपणे बांधण्यात आले होते. पण नंतर आरोप करण्यात आल्यानंतर संबंधित बंगले जमीनदोस्त करण्यात आल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. याप्रकरणी तत्कालीन सरपंच, सदस्य व शासकीय अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल झाले, तर माजी सरपंच प्रशांत मिसाळ यांना अटक झाली होती. हे प्रकरण आता चांगलेच तापले आहे.

रश्मी ठाकरे यांच्या कथित जमीन व्यवहाराची कागदपत्रे गहाळ करण्यात आले आहेत. उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी या जमीन व्यवहाराचे कागदपत्रे गहाळ करायला लावले आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास झाला पाहिजे”, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली होती. त्यानंतर आज ते महसूल कार्यालयात या प्रकरणी फाईल आणि संबंधित कागदपत्रे मिळवण्यासाठी आले होते. माहितीच्या अधिकाराखाली त्यांनी या प्रकरणातील कागदपत्रांची मागणी केली होती. तात्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने झालेल्या नोटींगची फाईल मागण्यात आली होती. परंतू यावेळी महसूल कार्यालयातील कोणत्याही अधिकाऱ्याने त्यांची दखल घेतली नाही.

त्यानंतर किरीट सोमय्या यांनी या महसूल कार्यालयाबाहेरच बसून ठिय्या आंदोलन पुकारलंय. मंत्रालयातील पहिल्या मजल्यावर सर्व कर्मचारी जमा झालेले आहेत. यावेळी माध्यमांनी त्यांची प्रतिक्रिया घेत असताना किरीट सोमय्या म्हणाले की, कार्यालयात २० मिनीटे बसल्यानंतर अधिकाऱ्यांनी कागदपत्र तयार केली आहे. इतर कागदपत्र तुम्हाला मुख्यमंत्री कार्यालयात मिळतील, असं मला सांगण्यात आलं आहे. त्यानुसार मी आता मुख्यमंत्री कार्यालयात कागदपत्र घेण्यासाठी जात आहे.”, असं किरीट सोमय्या म्हणाले. परंतू किरीट सोमय्या यांनी आपल्या शिंदे-भाजप सरकारविरोधात हे उपोषण पुकारल्यानं चर्चेचा विषय ठरतोय.

First Published on: April 21, 2023 3:19 PM
Exit mobile version