संजय राऊतांप्रमाणेच किरीट सोमय्या मुश्रीफांना म्हणतात, हिशोब द्यावा लागणार…

संजय राऊतांप्रमाणेच किरीट सोमय्या मुश्रीफांना म्हणतात, हिशोब द्यावा लागणार…

भाजप नेते मोहीत कंबोज यांनी अलीकडेच सिंचन घोटाळ्याची चौकशी करावी, अशी मागणी केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचा एक बडा नेता लवकरच तुरुंगात जाणार असे त्यांनी ट्विट केले होते. यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.

किरीट सोमय्या यांनी आज ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी एक पत्रही शेअर केले आहे. त्यानुसार, हसन मुश्रीफ यांचे जावई मतीन मंगोली यांच्याशी संबंधित जयोस्तुते प्रा. लि. कंपनीला दिलेल्या कंत्राटाचा उल्लेख करण्यात आला आहे. राज्यातील ग्रामपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषदांचे रिटर्न्स भरण्यासाठी देण्यात आलेल्या १५०० कोटींच्या कंत्राटात झालेल्या घोटाळ्याची चौकशी लोकायुक्तांकडून सुरू करण्यात आल्याचे म्हटले आहे. पुढे चौकशीचे आदेश राज्यपालांनी दिल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. २४ ऑगस्ट रोजी लोकायुक्तांसमोर मुश्रीफ यांनी ऑनलाइन पद्धतीने उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.

या आधी जारी केला होता व्हिडीओ –

सोमय्या यांनी एक व्हिडीओ जारी केला होता. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी मंत्री असताना स्वत:च्या जावयाच्या जयोस्तुते कंपनीला १५०० कोटी रुपयांचे कंत्राट दिले. हा भ्रष्टाचार आम्ही उघडकीस आणला होता. या प्रकरणाची आता लोकायुक्तांकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. २४ ऑगस्टला यावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे हसन मुश्रीफांना हिशोब द्यावा लागणार आहे, असे म्हटले होते.

First Published on: August 19, 2022 8:55 PM
Exit mobile version