गणेशोत्सवानंतर दीड लाख कोकणवासी एसटीतून मुंबईत दाखल

गणेशोत्सवानंतर दीड लाख कोकणवासी एसटीतून मुंबईत दाखल

गेल्या तीन महिन्यांपासून गणेशोत्सवाच्या लगबगीत व्यस्त असलेला मुंबईतील चाकरमानी गणेशोत्सव उत्साहात पार पाडत परतीच्या प्रवासासाठी निघाले आहेत. मात्र कोकणाकडे जाताना रेल्वेतील गर्दीचा सामना करावा लागला. त्यामुळे मुंबईकडे परतताना चाकरमान्यांनी एसटी बस गाड्यांना पसंती दिली. परतीच्या प्रवासासाठी एसटी महामंडळाकडून 2 हजार 24 बस गाड्यांची व्यवस्था केली होती. याद्वारे तब्बल दीड लाखांहून अधिक प्रवाशांनी रेल्वेचा धक्काबुक्कीपेक्षा एसटी बस गाड्यांनी प्रवास करत आपला परतीचा प्रवास सुखकर केला.

अनंतचतुर्दशीनंतर कोकणातून येणार्‍या रेल्वे गाड्यांमधील गर्दी आता ओसरली आहे. रेल्वे प्रशासनाने गणेश भक्तांसाठी विशेष गाड्या चालवल्या, परंतु या गाड्या नियोजित वेळेपेक्षा बर्‍याच उशिराने धावत आहेत. त्यामुळेही परतीच्या प्रवासाच्या वेळी चाकरमान्यांनी रेल्वेकडे पाठ केली. शनिवार, 14 सप्टेंबर रोजी रत्नागिरी-पनवेल रात्री तब्बल 3 तासाने मार्गस्थ झाल्याने प्रवाशांचा स्थानकातच खोळंबा झाला. याशिवाय गणपती विशेष सावंतवाडी- अहमदाबाद गाडीदेखील दीड तासाने स्थानकातून मार्गस्थ झाली. यासोबतच तुतारी एक्स्प्रेस, कोकणकन्या एक्स्प्रेस या गाड्याही मुंबईत येताना दीड ते दोन तास उशिरा पोहोचल्या, अशा प्रकारे कोकणातून येणार्‍या रेल्वे गाड्यांचे दिरंगाईचे वेळापत्रक अजून नियमित होत नाही, असे चित्र आहे.

First Published on: September 18, 2019 1:10 AM
Exit mobile version