Video: भररस्त्यात महिलेला केली अमानुष मारहाण

Video: भररस्त्यात महिलेला केली अमानुष मारहाण

Video: भररस्त्यात महिलेला केली अमानुष मारहाण

मुंबईतील खारमध्ये एनजीओच्या महिलेल्या अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एनजीओच्या ऑफिस शेजारी राहणाऱ्या व्यक्तीकडून ही मारहाण केल्याचं समोर आलं आहे. घराबाहेर ठेवलेल्या पाण्याच्या टँकवरुन दोघांमध्ये भांडण झालं होतं. त्यामुळे या व्यक्तीने एनजीओच्या महिलेला मारहाण केली आहे. याच मारहाणीचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. अत्यंत अमानुषपणे मारहाण केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. ६ फेब्रुवारीचा हा सीसीटीव्ही फुटेज आहे. या मारहाण करणाऱ्या आरोपीचे नावं अस्लम शेख असं आहे. ही महिला काम करत असलेली एनजीओ प्राण्यासाठी काम करते.

नक्की काय घडलं?

या एनजीओमध्ये लागणाऱ्या पाण्यासाठी नियमित येथे पाण्याचा टँक येत होता. २९ जानेवारीला हा पाण्याचा टँक जेव्हा एनजीओच्या येथे आला तेव्हा आरोपी अस्लम शेख आणि पीडित महिलेचा वाद झाला होता. याची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. त्याचाचं राग मनात धरून आरोपी पुन्हा त्या एनजीओ जवळ आला आणि त्याने त्या महिलेला सांगितलं की, तुमच्या एनजीओचा वास माझ्या घरात येतो. यावरून पुन्हा त्यांच्यात वाद झाला आणि मग या वादाच रुपांतर हाणामारी मध्ये झालं. आरोपीने महिलेला भररस्त्यात खेचून मारहाण केली आहे. या आरोपी विरोधात खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहे.


हेही वाचा – नवी मुंबईत इमारतीला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी टळली!


 

First Published on: February 8, 2020 1:39 PM
Exit mobile version