महिलेने केले चिमुकलीचे अपहरण

महिलेने केले चिमुकलीचे अपहरण

प्रातिनिधिक छायाचित्र

जावेला मुलगी नसल्याने एका महिलेने तीन वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. सकिना उमर (२९) आणि फतिमा उमर (३९) अशी या महिलांची नावे आहेत.

नेमके काय घडले?

भायखळा परिसरात घरकाम करणाऱ्या महिलेच्या मुलीचे अपहरण करण्यात आले होते. १६ डिसेंबर रोजी भायखळा स्थानकातून तिचे अपहरण करण्यात आले. चिमुकलीला शोधण्यासाठी आग्रीपाडा पोलिसांनी भायखळा, कल्याण ते अगदी पुणे स्थानकावरील संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज तपासले. यात अपहरण झालेली तीन वर्षांची मुलगी एका तरुणासोबत भायखळा स्टेशन परिसरात दिसली. त्यानंतर काही वेळाने तिथे एक महिला बॅग घेऊन तिथे आली आणि तिने चिमुकलीला घेऊन पुण्याला जाणारी ट्रेन पकडली. मात्र ही चिमुकली पुण्याला देखील सापडली नाही.

या ठिकाणी सापडली चिमुरडी

पुण्याला या चिमुकलीचा शोध घेतला मात्र ही चिमुकली पुण्याला देखील सापडली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा भायखळा येथील सीसीटीव्ही फुटेज पाहण्यात आले. त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती महिला पीसीओवरुन फोन करत असल्याचे आढळले. त्यानुसार पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी त्या पीसीओचे कॉल डेटा तपासला असता हैदराबादमधील एका महिलेला फोन केल्याचे समोर आले. पोलिसांच्या पथकाने तातडीने हैदराबादमधील त्या क्रमांकाचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्यानुसार हैदराबादमध्ये फोन केलेल्या ठिकाणाचा पत्ता पोलिसांच्या हाती लागला. त्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी त्या घरी धडक दिली. ते घर फातिमा या महिलेचे असल्याचे समोर आले असून त्या घरात ती चिमुरडी आढळून आली. फातिमा या महिलेला भायखळा पोलीस ठाण्यात आणून त्या महिलेची कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीत तिने सकिनाचा पुण्यातील पत्ता सांगितला. या आधारे पोलिसांनी सकिनाचे घर शोधत तिलाही ताब्यात घेऊन तिची ही चौकशी करण्यात आली. त्यावेळी सकिना या महिलेने त्या चिमुरडीचे अपहरण केले असून आपली जाव फतिमा हिला मुलगी नसल्याने त्या चिमुरडीचे अपहरण केल्याचे उघडकीस आहे आहे.


वाचा – व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण


 

First Published on: December 25, 2018 8:28 PM
Exit mobile version