‘लालबागच्या राजा’ला विदेशी नागरिकांची उपस्थिती

‘लालबागच्या राजा’ला विदेशी नागरिकांची उपस्थिती

गणपती बाप्पा मोरया…मंगल मूर्ती मोरयाच्या जय घोषात भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाचे स्वागत केले. त्यासोबतच देश विदेशातील अनेक गणेश भक्तांच श्रद्धास्तान असणाऱ्या लालबागचा राजा देखील आपल्या भव्य मंडपात विराजमान झाला आहे. अनेक गणेश भक्तांनी आपल्या बाप्पाच्या दर्शनाला बुधवारपासू लांबच लांब रांगा लावल्या आहेत. राज्यातील अनेक ठिकाणाहून गणेश भक्त लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आले आहेत. महत्वाची बाब म्हणजे विदेशी नागरिकांनी देखील लालबागच्या दर्शनाला हजेरी लावली आहे. अनेक भाविकांनी आज पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने लालबागमध्ये गर्दी केलेली पाहायला मिळत आहे. आज पहिल्याच दिवशी एवढी गर्दी पाहता येत्या ११ दिवसात ही गर्दी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लालबागला आलेल्या भक्तांच्या गर्दीचे चोख व्यवस्थापन करायला फक्त पोलीस दल किंवा मंडळातील कार्यकर्तेच नव्हे तर कॉलेजच्या तरुण पिढींनी देखील सहभाग घेतला आहे. परेल येथील एमडी कॉलेजचे एन.एस.एसचे विद्यार्थी आणि एनसीसीचे विद्यार्थी देखील चोख व्यवस्थाकरत आहेत.

विदेशी नागरिकांची उपस्थिती

लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी विविध ठिकाणाहून भक्त मोठ्या संख्येने दाखल होतात. आता विदेशातील नागरिक देखील लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी आज मुंबईत दाखल झाले आहेत. टोकीयो, दुबई, कॅनडा आणि यूएसमधील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजोरी लावली आहे.
राज्यातील इतर भागांतून देखील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली आहे. पुणे, गुजरात, हैदराबाद आणि तमिळनाडू या ठिकाणाहून अनेक भक्त लालबाग राजाच्या दर्शनाला आले आहेत.

मुख दर्शन आणि नवसाची रांग

लालबागच्या राजाच्या दर्शनाकरत वेगवेगळ्या रांगा लावण्यात आल्या आहेत. नवसाची आणि मुख दर्शनाची अशा दोन वेगळ्या रांगा करण्यात आल्या आहेत. नवसाच्या रांगेतून जाण्यासाठी जिजामात या ठिकाणाहून मार्ग देण्यात आला आहे. तर मुख दर्शनाकरता लालबागच्या ठिकाणाहून जावे लागत आहे.

First Published on: September 13, 2018 8:33 PM
Exit mobile version