यंदा लालबाग राजाची मूर्ती विराजमान होणार, भक्तांना ऑनलाईन दर्शन घेता येणार

यंदा लालबाग राजाची मूर्ती विराजमान होणार, भक्तांना ऑनलाईन दर्शन घेता येणार

यंदा लालबाग राजाची मूर्ती विराजमान होणार, भक्तांना ऑनलाईन दर्शन घेता येणार

गेल्या वर्षी पहिल्यांदा कोरोनामुळे लालबाग राजाची मूर्ती विराजमान न होता गणेशोत्सव साजरा करण्यात आला होता. आरोग्य उत्सव म्हणून गणेशोत्सव साजरा केला होता. मात्र यंदा ‘लालबागचा राजा’च्या भक्तांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. यावर्षी लालबागच्या राजाची मूर्ती विराजमान करून गणेशोत्सव साजरा होणार आहे. याबाबत लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने माहिती दिली आहे. राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. तसेच भक्तांना लालबागच्या राजाचं ऑनलाईन दर्शन घेत येणार आहे.

लालबाग राजा गणेशोत्सव मंडळाने मागच्यावर्षी आरोग्य उत्सव साजरा करून एक नवा आदर्श निर्माण केला होता. याचे कौतुक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. अशाच प्रकारे इतर मंडळांनी देखील गणेशोत्सव साजरा केला. मात्र यावर्षी लालबाग राजा विराजमान होणार आहे. काल याबाबत लालबाग राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची बैठक पार पडली. बैठकीमध्ये मंडळाने यावर्षी कोरोनाची सध्याची एकंदर परिस्थिती पाहता करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आपल्या लाडक्या लालबागच्या राजाचा उत्सव महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार १० सप्टेंबर ते १९ सप्टेंबर २०२१ या कालावधीत साजरा करण्याचे ठरविले आहे. या उत्सवकाळात सर्व भाविकांना लालबागच्या राजाचे दर्शन ऑनलाईन माध्यमातून घेता येईल. सदर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण मंडळाच्या अधिकृतसाईट वर करण्यात येईल.

मंडळाच्या या अधिकृत वेबसाइटला भेट द्या 
http://bit.ly/2uHKCz2
मंडळाचे अधिकृत यूट्यूब चॅनल
https://www.youtube.com/user/LalbaugRaja/live
मंडळाचे अधिकृत फेसबुक पेज
facebook.com/lalbaugcharaja
मंडळाचे अधिकृत ट्विटर अकाऊंट
twitter.com/lalbaugcharaja
मंडळाचे अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट
instagram.com/lalbaugcharaja

गेल्या वर्षीचा काय होता आरोग्य उत्सव?

First Published on: August 1, 2021 11:27 AM
Exit mobile version