गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती नाजूक

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती नाजूक

लता मंगेशकर

रविवारी मध्यरात्रीनंतर दीडच्या सुमारास श्वसनाचा त्रास झाल्याने ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात करण्यात आले होते. ब्रीच कँडी रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर फारुख उदवाडिया यांच्या देखरेखीखाली औषधौपचार सुरू होते. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले असून आता लता दीदींना वेन्टीलेटरवर ठेवण्यात आले आहे.

लता दीदींची प्रकृती दिवसेंदिवस नाजूक

लता मंगेशकर हे फुफ्फुसाच्या गंभीर इन्फेकशनला सामोरे जात असून त्यांना निमोनिया देखील झाल्याचे सांगितले जात आहे. त्यांचे डावीकडील वेंट्रिक्युलरने काम करनं बंद केले आहे. शरिराला ऑक्सिजन पुरविण्याचे काम डावीकडील वेट्रिकुलर करत असते. शरिर सुव्यवस्थेत कार्य करावे याकरता वेंट्रिक्युलर महत्वाचे काम करत असते. परंतु ९० व्या वर्षी लता दीदींची प्रकृती दिवसेंदिवस नाजूक होताना दिसत आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, रविवारी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र, लता मंगेशकर यांच्या भगिनी उषा मंगेशकर यांनी असे सांगितले की, मंगळवारी रुग्णालयातून घरी जाण्याची परवानगी मिळू शकते. मात्र सध्या त्याची प्रकृती बघता त्यांना एक-दोन दिवस रूग्णालयातच उपचार सुरू राहू शकतात.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती लवकरात लवकर स्थिर व्हावी, याकरता सर्वच जण प्रार्थना देखील करताय. यावेळी बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी यांनी लता मंगेशकर यांच्यासाठी प्रार्थना करतानाचे ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी देवाकडे प्रार्थना करत लवकर या सकंटातून मुक्त व्हावे, असे लिहिले आले.


लता मंगेशकर रुग्णालयात दाखल
First Published on: November 12, 2019 1:23 PM
Exit mobile version