अग्निसुरक्षा यंत्रणेत हलगर्जीपणा; १० नर्सिंग होमविरोधात एफआयआर

अग्निसुरक्षा यंत्रणेत हलगर्जीपणा; १० नर्सिंग होमविरोधात एफआयआर

मुंबईतील रूग्णालये व नर्सिंग होममधील हलगर्जीपणामुळे अग्निसुरक्षा यंत्रणेबाबत होत असलेल्या हलगर्जीपणामुळे त्याठिकाणी आगी लागण्याच्या घटना घडतात. त्यात जीवित व वित्तीय हानी होते. ही गंभीर बाब लक्षात घेऊन खडबडून जागे झालेल्या मुंबई महापालिका व अग्निशमन दलाने ११ ते २५ जुलै दरम्यान राबविलेल्या धडक मोहिमेत अनेक नर्सिंग होममध्ये सुरक्षा यंत्रणेबाबत अक्षम्य हलगर्जीपणा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे पालिकेने धडक कारवाईचे पाऊल उचलत १० नर्सिंग होमविरोधात ‘एफआयआर’ दाखल केले आहेत.

तसेच १,२५७ पैकी ६५० नर्सिंग होमला नोटिसा बजावल्या आहेत तर ५१ नर्सिंग होमविरोधात कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. त्याचप्रमाणे ४४१ नसिॅग होममध्ये अग्निसुरक्षा यंत्रणा कुचकामी असल्याचे आढळून आले आहे. तर १८१ नर्सिंग होम बंद अवस्थेत आढळून आले आहेत. तसेच, चार नसिॅग होमकडून प्रत्येकी १० हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे. यासंदर्भातील माहिती पालिका कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली आहे.

मुंबईतील रुग्णालये, नर्सिंग होम या ठिकाणी रुग्णांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अग्निसुरक्षा यंत्रणा आहे की नाही, ती कार्यान्वित आहे की नाही, त्यात काही गंभीर त्रुटी आहेत का, त्यात काही सुधारणा करण्यात आल्या आहेत की नाही, याबाबत पालिका, अग्निशमन दलाकडून ११ ते २५ जुलै दरम्यान धडक मोहिम मुंबईत राबविण्यात आली होती.

त्यात ज्या नर्सिंग होममध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्या, यंत्रणा कुचकामी असल्याचे आढळून आले त्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यामुळे आता मुंबईतील नर्सिंग होमचे धाबे दणाणले आहेत. मात्र काही नर्सिंग होमला अग्निसुरक्षा यंत्रणा बसविण्यासाठी व त्रुटी दूर करण्यासाठी नोटिसा बजावून काही मुदत देण्यात आली आहे. त्यांनंतरही त्रुटी आढळल्यास संबधित नर्सिंग होमवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.


मंकीपॉक्सचा भारतात पहिला बळी, दुबईतून परतला होता 22 वर्षीय तरुण


First Published on: August 1, 2022 9:11 PM
Exit mobile version