स्वच्छतेचे महत्व सांगणारी एल.ई.डी. व्हॅन फिरणार गावोगावी

स्वच्छतेचे महत्व सांगणारी एल.ई.डी. व्हॅन फिरणार गावोगावी

स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत राज्य शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने पाणी व स्वच्छते विषयी जनजागृती करणारी एल.ई.डी. व्हॅन ठाणे जिल्हाच्या ग्रामीण भागात दाखल झाली आहे. सोमवारी जिल्हा परिषदेच्या आवारात जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष दिपाली पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी एल.ई.डी. व्हॅनला हिरवा झेंडा दाखवून व्हॅन गावोगाव फिरण्यासाठी रवाना करण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये स्वच्छता विषयी जागृती निर्माण व्हावी, स्वच्छतेचे महत्वपटावे यासाठी विविध जनजागृतीपर उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. तसेच स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापना संदर्भात देखील कार्यशाळा घेण्यात आल्या आहेत. या एल. ई. डी व्हॅनच्या माध्यमातून जिल्ह्यातील सुमारे दीडशे गावातील शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायतमधून पाणी व स्वच्छता विषयाचे माहितीपट, जाहिरात, लघुचित्रपट दाखवले जाणार आहेत. यावेळी आरोग्य व बांधकाम समिती सभापती वैशाली चंदे, महिला व बाल कल्याण समिती सभापती सपना भोईर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ब. भि. नेमाने, मुख्य लेखा व वित्त अधिकारी गीता नागर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( पाणी व स्वच्छता ) छायादेवी शिसोदे, शिक्षणाधिकारी ( माध्यमिक ) शेषराव बढे, तसेच जिल्हा परिषद सदस्य, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

First Published on: December 23, 2019 9:17 PM
Exit mobile version