कायदेशीर आणि टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे – मुख्यमंत्री

कायदेशीर आणि टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘कायदेशीर बाजू समजून न घेता भावनेच्या भरात बोलल्यास फायदा नाही. तर, आरक्षण मिळण्यासाठी कायदेशीर बाबी नीट लक्षात घ्याव्या लागतील. घडलेल्या घटना या व्यथित करणाऱ्या आहेत. राज्य सरकार आपलं काम प्रामाणिकपणे काम करत आहे. कायदेशीर आणि टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे’ असं वक्तव्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘छत्रपती राजाराम महाराज यांचे विचार’ या पुस्तक प्रदर्शनाच्या कार्यक्रमात केलं आहे. ‘मराठा आरक्षणासंदर्भात अध्यादेश काढता येईल पण तो टिकणार नाही. समाजाला फसवायचं नाही आहे. आरक्षणाची मुहूर्तमेढ ज्या शाहू महाराजांनी केली, त्यांच्यासारखंच विवेकीबुद्धीनं काम करायला हवं. ज्यांना समजत नाही, त्यांना हे योग्य प्रकारे समजेल आणि राज्य सरकारची पुढे लोक साथ देतील अशी मला आशा आहे,’ असाही विश्वास असल्याचं त्यांनी कार्यक्रमादरम्यान व्यक्त केला आहे.
मुंबईतील डिरेक्टोरेट ऑफ आर्किओलॉजी अँड म्युझियम्समध्ये ‘छत्रपती राजाराम महाराज यांचे विचार’ या पुस्तक प्रदर्शनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी आपलं मत आज मराठा आरक्षणाच्या बाबतीत व्यक्त केलं आहे.

First Published on: July 31, 2018 5:06 PM
Exit mobile version