ठाणे-रायगड जिल्ह्यात हळदीत ‘लिंबू कापला…’ गाण्याची धूम!

ठाणे-रायगड जिल्ह्यात हळदीत ‘लिंबू कापला…’ गाण्याची धूम!

आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना

सध्या लग्नांचा धूमधडाका सुरू आहे. आगरी-कोळी समाजात लग्नसोहळ्याच्या आदल्या दिवशी हळदी समारंभ मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. ठाणे आणि रायगड जिल्ह्यात प्रत्येक हळदी समारंभात ‘लिंबू कापला, रस गलू लागला’ या गाण्याची जबदरस्त धूम आहे.

ठाणे रायगड जिल्ह्यात सर्वाधिक आगरी-कोळी समाज आहे. आगरी-कोळी समाजात विवाहापूर्वी हळदी समारंभ मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. हळदी समारंभात दालमुंडीचा बेत असतोच. आगरी-कोळी समाजातील गाणी डिजेवर वाजवली जातात. यंदाच्या हळदीत ‘लिंबू कापला, रस गलू लागला…, या गाण्याची जबरदस्त क्रेझ पसरली आहे. शिवा म्हात्रे यांनी हे गाणं गायलं आहे तसेच ती लिहिलेही आहे. डिजे असो बँड असो वा आर्केस्ट्रा या गाण्यांना खूपच मागणी आहे. हळदीवर आधारीत हे गाणं असल्याने प्रत्येक लग्न मंडपात हे गाणं वाजवलं जात आहे. आगरी-कोळी समाजात विवाहाच्या परंपरा आहेत. त्यात धवला गीत ही महत्वाची परंपरा असून ती आजही सुरू आहे. धवला गीत गाणारे वयोवृध्द मंडळी असतात. तसेच अनेकजण हळदीसाठी विशेष गाणंही बनवून घेतात. त्यात कुटूंबातील आणि नातेवाईकांच्या नावांचा उल्लेख असतो. त्यामुळे स्वत:वरील गाण्यांनाही चांगलीच मागणी आहे. आगरी कोळी समाजात लग्न सोहळयावर लाखो रूपये खर्च केले जातात. विवाह सोहळ्यावर अनाठायी खर्च करू नका याची जनजागृती करण्यासाठी आगरी वधूवर सामुदायिक विवाह सोहळा समितीच्यावतीने समाज प्रबोधन यात्रा काढली होती. पण तरीसुध्दा आगरी-कोळी समाजाचे विवाह सोहळे दणक्यात होताना दिसत आहेत.

सौजन्य – आरबीएस डिजिटल, स्वर म्युजिक 

First Published on: May 20, 2019 10:38 PM
Exit mobile version