Video: ‘उद्धव साहेबांना लाज वाटू दे’ लोकल प्रवासी महिलेचा संताप

Video: ‘उद्धव साहेबांना लाज वाटू दे’ लोकल प्रवासी महिलेचा संताप

Video: 'उद्धव साहेबांना लाज वाटू दे' लोकल प्रवासी महिलेचा संताप

कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून सर्वसामान्यांना लोकल प्रवास करण्यासाठी बंदी घातली आहे. त्यामुळे बऱ्याच दिवसांपासून सर्वसामान्यांना लोकल प्रवास कधी मिळणार? याच्या प्रतिक्षेत नागरिक होते. पण आता ठाकरे सरकारने कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या सर्वसामान्यांना लोकल प्रवासासाठी मंजुरी दिली आहे. १५ ऑगस्टपासून दोन डोस घेतल्यांना लोकल प्रवास करता येणार आहे. पण यादरम्यान रेल्वे कर्मचाऱ्यांकडून कारवाई करण्यात आलेल्या एका महिलेचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ही महिला ठाकरे सरकारचा धिक्कार म्हणतं उद्धव साहेबांना लाज वाटली पाहिजे, अशा प्रकारे महिलेने संताप व्यक्त केला आहे. सध्या या महिलेचा व्हिडिओ चांगलांच चर्चेत आला आहे.

नक्की काय घडलं?

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील ही घटना असून या महिलेकडे तिकिट असूनही ५०० रुपये दंड भरण्यास सांगितले होते. कारण ही महिला ज्या लोकांना लोकल प्रवासासाठी परवानगी देण्यात आली आहे, अशामध्ये मोडत नव्हती. त्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांनी तिला पकडलं आणि तिच्यावर ५०० रुपयांचा दंड ठोठावला. मात्र महिलेने दंड भरण्यासाठी ५०० रुपये नसल्याचे सांगितले. या महिलेने तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकाराचे फेसबुक लाईव्ह केले आहे.

या व्हिडिओमध्ये पाहू शकता की, माझ्याकडे पैसे नाहीत मला पैसे द्या, असं म्हणत आजूबाजूच्या प्रवाशांकडे महिला पैसे मागत आहेत. माझ्याकडे ५०० रुपये नसून माझ्यावर कारवाई करा. मला किती वेळ बसवायचंय आहे, तितक्या वेळ बसवा. मी आता मास्क लावणार नाही, त्याचा पण मी दंड भरणार नाही. हा महिलांवर होणारा अत्याचार आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ऐकावं. मी सरकारचा निषेध करते. महिलांना अशाप्रकारे वेठीस धरणं चुकीचं आहे. जर आम्ही नोकरी नाही केली तर पैसे आणणार कुठून? ५०० रुपये दंडाच्या नावाखाली सरकार पैसे लुटत आहे. महिलांचा संताप बघून तरी उद्धवसाहेबांना लाज वाटू दे, असा संताप महिलेने व्यक्त केला आहे.

पाहा महिलेचा पूर्ण व्हिडिओ 

 

“हा अत्याचार आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.
मी ५०० रुपये भरणार नाही!” चिडलेल्या महिलेकडून सरकार चे वाभाडे!

Posted by माझा महाराष्ट्र माझा अभिमान on Monday, August 9, 2021

 

First Published on: August 12, 2021 1:17 PM
Exit mobile version