Unlock Mumbai: उद्यापासून लोकल सेवा होणार सुरु?

Unlock Mumbai: उद्यापासून लोकल सेवा होणार सुरु?

लोकल ट्रेन

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर धावणारी उपनगरीय लाेकल सेवा देण्यास सज्ज आहे. मात्र राज्य सरकारकडून आतापर्यंत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची यादी रेल्वेला आलेली नाही. यादी मिळताच मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासन लोकल फेऱ्या सोडण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. रविवारी रात्रीपर्यंत राज्य सरकारकडून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची यादी येणार आहे. त्यामुळे सोमावरपासून लोकल सुरू होण्याची दाट शक्यता आहे, अशी माहिती रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना बेस्ट, एसटीच्या बसद्वारे सेवा पुरविली जात आहे. मात्र या बसमधील प्रवासातील वेळ, फिजिकल डिस्टनसिंगचे तीनतेरा, बसमध्ये जाण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या लांबच्या लांब रांगेमुळे कर्मचाऱ्यांना प्रवास नकोसा आणि जीवघेणा वाटू लागला आहे. त्यामुळे फक्त आत्यावश्यक सेवेतील कामगारांसाठी लाेकल सुरु करण्यात यावी, आशी मागणी सतत राज्य सरकारद्वारे केंद्राला आणि रेल्वे मंत्र्याकडे करण्यात आली आहे. त्यानुसार लाेकल सेवा सुरु करण्याची तयारी रेल्वेने केली आहे. रविवारी राज्य सरकार आणि रेल्वे आधिकाऱ्यांमध्ये याबाबत आंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. मात्र आतापर्यंत रेल्वेला अत्यावश्यक सेवेत काम करण्याची यादी रेल्वेला दिली नाही आहे. राज्य सरकारच्या मागणीनुसार रेल्वे मंत्रालयाने आत्यावश्यक सेवेतील कामगारांसाठी लाेकल चालवण्यास सकारात्मक दाखविली आहे. त्याबाबत एक बैठक देखील झाली हाेती.

असा करावा लागेल प्रवास

प्रवाशांना रेल्वेकडून कोणतेही तिकिट देण्यात येणार नाही. लाेकल चालवण्यासाठी राज्य सरकार कामगारांची यादी रेल्वेला देणार आहे. त्याआधारे रेल्वे तिकिट काढून राज्य सरकारला देईल. राज्य सरकार तिकिटाचे पैसे आगाऊ रेल्वेला देणार आहे. तसेच कामगारांना राज्य सरकारतर्फे क्यू आर काेड वाले आयकार्ड देणार आहे. या लोकल फक्त जलद मार्गावर धावणार आहेत. तसेच ही लोकल सेवा पॉईण्ट टू पॉईण्ट चालवण्यात येणार आहेत. रेल्वे स्थानक आणि लोकलमधील गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकार ऑफिसचा वेळ ठरवेल. कामगारांचे तिकिट, थर्मल तपासणीची जबाबदारी राज्य सरकारची आसणार आहे.

हेही वाचा –

कांदा चाळीत युरिया टाकून नुकसान; अज्ञाताविरुद्ध देवळा पोलिसांत तक्रार दाखल

First Published on: June 14, 2020 6:49 PM
Exit mobile version