शिवसेनेच्या २१ उमेदवारांची नावे जाहीर

शिवसेनेच्या २१ उमेदवारांची नावे जाहीर

शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे

लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने आपल्या उमेदवारांची पहिली यादी शुक्रवारी जाहीर केली. पहिल्या २१ जणांच्या यादीमध्ये उस्मानाबाद येथील खासदार रवींद्र गायकवाड वगळता पुन्हा एकदा विद्यमान खासदारांना शिवसेनेने संधी दिली आहे. गायकवाड यांचा पत्ता कापून त्यांच्या जागी शिवसेनेने ओमराजे निंबाळकर यांना संधी दिली आहे. मुंबईतून विद्यमान खासदार गजानन किर्तीकर, अरविंद सावंत आणि राहुल शेवाळे यांना शिवसेनेने पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.तर पालघर आणि सातारा लोकसभा मतदार संघाच्या दोन्ही उमेदवारांची नावे अद्याप जाहीर केलेली नसून रविवारपर्यंत ही नावे जाहीर केली जातील,असे शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी स्पष्ट केले. नाशिकमधून हेमंत गोडसे यांनाही पक्षाने पुन्हा संधी दिली आह

तर पालघर आणि सातारा लोकसभा मतदार संघाच्या दोन्ही उमेदवारांची नावे अद्याप जाहीर केलेली नसून रविवारपर्यंत ही नावे जाहीर केली जातील,असे शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी स्पष्ट केले. नाशिकमधून हेमंत गोडसे यांनाही पक्षाने पुन्हा संधी दिली आहे.शिवसेना आणि भाजपाची युती झाल्यानंतर दोनच दिवसांपूर्वी भाजपाने आपली पहिली यादी जाहीर केली. त्यानंतर शुक्रवारी शिवसेनेने आपल्या २३ मतदार संघापैंकी २१ मतदार संघांच्या उमेदवारांची नावे मातोश्रीवर पत्रकार परिषदेत शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी जाहीर केली. यावेळी शिवसेना सचिव अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर आणि विनायक राउुत आदी उपस्थित होते. युती झाल्यानंतर शिवसेना आपल्या कोणत्याही विद्यमान खासदारांमध्ये बदल करणार नाही, हे स्पष्ट होते. त्यामुळे अपेक्षेप्रमाणेच शिवसेनेने २१ उमेदवारांची नावे जाहीर केली. उस्मानाबाद येथील खासदार रवींद्र गायकवाड यांचा पत्ता कापून त्यांच्या जागी ओमराजे निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर केली.

पालघर आणि सातारा या दोन मतदार संघाच्या उमेदवारांची नावे पक्षाने गुलदस्त्यात ठेवली आहे. पालघर मतदार संघ हा शिवसेनेने भाजपाकडून आपल्याकडे घेतला आहे. याठिकाणी श्रीनिवास वनगा यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. परंतु या मतदार संघात भाजपा पदाधिकार्‍यांकडून बंडाची निशाणी फडकवल्यामुळे सध्या त्यातील उमेदवारी राखून ठेवली आहे. तर सातारा लोकसभा मतदार संघातून शिवसेनेच्या तिकीटावर माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांचे नाव चर्चेत आहे. शुक्रवारी दुपारी त्यांनी मातोश्रीवर जावून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. मात्र अधिकृत प्रवेश हा कोल्हापूर येथे होणार्‍या शुभारंभाच्या प्रचारसभेत होणार आहे. त्यामुळे जाहीर सभेनंतरच नरेंद्र पाटील यांच्या नावाची घोषणा होवू शकते,असे शिवसेनेच्या सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.

तर पालघर,ईशान्य मुंबईची अदलाबदल

ईशान्य मुंबईतून किरीट सोमय्यांना विरोध होत असल्याने आणि पालघरमधून भाजपाकडून शिवसेना उमेदवाराला विरोध होत असल्याने आता या दोन्ही मतदार संघांची अदलाबदल करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपा आणि शिवसेनेने या दोन्ही मतदार संघातील उमेदवार जाहीर न केल्यामुळे ही शक्यता अधिक बळावली आहे.

शिवसेनेच्यावतीने जाहीर झालेल्या उमेदवारांची नावे

दक्षिण मुंबई- अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबई- राहुल शेवाळे, उत्तर पश्चिम मुंबई – गजानन किर्तिकर, ठाणे- राजन विचारे, कल्याण- श्रीकांत शिंदे, हिंगोली- हेमंत पाटील, रायगड- अनंत गिते, रत्नागिरी सिंधुदूर्ग- विनायक राऊत, कोल्हापूर- संजय मंडलिक, हातकणंगले- धेर्यशिल माने, नाशिक- हेमंत गोडसे, शिर्डी- सदाशीव लोखंडे, शिरूर- शिवाजीराव आढळराव-पाटील, औरंगाबाद- चंद्रकांत खैरे, वाशीम- भावना गवळी, बुलढाणा- प्रतापराव जाधव, रामटेक- कृपाल तुमाणे, अमरावती- आनंदराव अडसूळ, परभणी- संजय जाधव, मावळ- श्रीरंग बारणे, उस्मानाबाद- ओमराजे निंबाळकर

या इच्छुक उमेदवारांबाबत रविवारी घोषणा

सातारा-पुरोषोत्तम जाधव आणि भाजपचे माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील शिवसेनेतून इच्छुक
पालघर- श्रीनिवास वनगा

राष्ट्रवादीचे माढातून संजय शिंदे, उस्मानाबादेत राणा जगजितसिंह

माढ्याचा तिढा सोडवण्यात राष्ट्रवादीला यश आले आहे. मोहिते पाटीलांच्या नाराजीकडे दुर्लक्ष करत शरद पवार यांनी माढा मतदारसंघासाठी सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय मामा शिंदे तर उस्मानाबादसाठी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या नावाची घोषणा शुक्रवारी केली. बारामती येथे अप्पासाहेब पवार सभागृहात संजय शिंदे यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

First Published on: March 23, 2019 6:10 AM
Exit mobile version