Lok Sabha 2024 : विजय वडेट्टीवारांविरोधात आंदोलन शिवसेनेला भोवणार; सचिवांसह ११ जणांवर गुन्हा दाखल

Lok Sabha 2024 : विजय वडेट्टीवारांविरोधात आंदोलन शिवसेनेला भोवणार; सचिवांसह ११ जणांवर गुन्हा दाखल

मुंबई : काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबईच्या २६/११ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या हेमंत करकरे यांच्या निधनाबद्दल वादग्रस्त विधान केले. यानंतर राज्यात अनेक नेत्यांकडून त्यांच्यावर टीका करण्यात आली. यावरून राजकीय वातावरण तापले असताना शिवसेनेने त्यांच्याविरोधात सोमवारी बाळासाहेब भवन, मुंबई येथे आंदोलन केले. याप्रकरणी आता शिवसेनेच्या सचिवांसह ११ शिवसेना पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :Vijay Wadettiwar : कसाब नव्हे तर पोलिसांच्या गोळीने झाला करकरेंचा मृत्यू; वडेट्टीवारांच्या विधानाने नवा वाद

मुंबईतील बाळासाहेब भवनाजवळ शिवसेनेकडून विजय वडेट्टीवार यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून त्यांचा निषेध करण्यात आला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात जमावबंदी असतानादेखील हे आंदोलन करण्यात आले. त्यामुळे मरीन ड्राईव्ह पोलिसांनी शिवसेना सचिव किरण पावसकर यांच्यासह ११ पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी विधान केले होते की, शहिद हेमंत करकरे यांचा मृत्यू दहशतवादी कसाबच्या गोळीने झाला नव्हता. तर, ती गोळी आरएसएसशी संबंधित पोलीस अधिकाऱ्याच्या बंदुकीतून सुटली होती. हे सत्य अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी न्यायालयापासून लपवून ठेवले होते आणि अशा देशद्रोहीला भाजपने उमेदवारी दिल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला होता.

हेही वाचा :Lok Sabha 2024 : उज्ज्वल निकम यांची स्वपक्षावरच टीका; भाजपाचा ढोंगीपणा केला उघड

विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या या विधानानंतर राज्यभरातून अनेक नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली. यावर ते म्हणाले की, शहीद हेमंत करकरे यांना लागलेली गोळी ही दहशतवादी कसाबच्या बंदुकीतून निघाली नव्हती. हे विधान एस.एम. मुश्रीफ यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या आधारावर केले होते. ही गोष्ट जर खरी असेल तर हा देशद्रोह आहे, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. “तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख तेव्हा उज्ज्वल निकम यांना म्हणाले होते की, कसाबला फाशी झाली म्हणून श्रेय घेण्याची गरज नव्हती. कारण तो दहशतवादी होता, त्यामुळे तालुका पातळीच्या वकिलानेही हा खटला लढवला असता तरीही त्याला फाशीच झाली असती. त्यामुळे त्यांनी मोठेपणा करण्याचे कारण नव्हते, अशा शब्दात विलासराव देशमुखांनी सुनावले होते. त्यांनी उज्ज्वल निकम यांना तेव्हाच ओळखले होते. त्यामुळे आम्ही जे काही बोलत आहोत, त्याचा खुलासा उज्ज्वल निकमांनी करावा. लोकसभेच्या रिंगणात नक्कीच त्यांचा पराभव होईल.” अशी टीका यावेळी विजय वडेट्टीवार यांनी केली.


Edited By : Abhijeet Jadhav

First Published on: May 7, 2024 12:04 PM
Exit mobile version