Lok Sabha 2024 : महाराष्ट्रात पंतप्रधान मोदींच्या वाढल्या सभा; फडणवीसांनी दिले विरोधकांना उत्तर

Lok Sabha 2024 : महाराष्ट्रात पंतप्रधान मोदींच्या वाढल्या सभा; फडणवीसांनी दिले विरोधकांना उत्तर

मुंबई : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्रात सर्वाधिक लक्ष दिल्याचे दिसून येते. कारण, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यावेळी राज्यात जास्त सभा घेतल्या जात आहेत. भाजप महायुतीला राज्यात विजयासाठी पोषक वातावरण नसल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना राज्यात जास्त सभा घ्यावा लागत आहेत, असे विरोधकांकडून टीका केली जात आहे. यावर भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत ‘किती जागांवर विजय मिळणार’ याचा आकडादेखील सांगितला आहे.

हेही वाचा : Lok Sabha Election 2024 : पूल नाही तर मतदान नाही; महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील गावकरी आक्रमक

गेल्या २ निवडणुकांपेक्षा या निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सर्वाधिक सभा राज्यभर ठेवण्यात आल्या आहेत. यावरून विरोधकांनी, भाजपला विजयी होऊ असा विश्वास नसल्याने हे करावे लागत आहे, असा आरोप केला होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “आता विरोधी पक्षातील नेत्यांना ऐकण्यासाठी राज्यातील जनता उत्सुक नाही. आम्हाला विजयाचा आत्मविश्वास आहे. २००९ आणि २०१४मध्ये पंतप्रधान मोदी दिवसाला एक -दोन सभा घ्यायचे, यावेळी फक्त ३-३ सभा घेत आहेत. आमच्या नेत्याला ऐकण्यासाठी लोक उत्सुक असून त्यांच्या सभेला गर्दी होते. मग आम्ही त्यांना का बोलवू नये?” असा सवाल त्यांनी यावेळी केला.

हेही वाचा : Lok Sabha 2024 : माझ्या नादी लागू नका, नाहीतर…, राजन विचारेंचा इशारा कोणाला?

पुढे विजयी जागांबद्दल बोलताना ते म्हणाले की, “गेल्या लोकसभा निवडणुकांपेक्षा यंदा राज्यात भाजप महायुतीच्या जागा वाढणार आहेत. मला खात्री आहे की जनता ही पंतप्रधान मोदींच्या पाठीशी आहे. यावेळी महायुती २०१९मधील जागा तर राखेलच, शिवाय अधिक ४० जागा नक्कीच जिंकेल.” असा विश्वास त्यांनी दर्शविला आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरेंबद्दल केलेल्या स्तुतिसुमनांवर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “भाजप आणि उद्धव ठाकरे यांची युती पुन्हा होणे शक्य नाही. पण त्यांनी वैयक्तिकदृष्ट्या काही मदत मागितली तर मी नक्की करेन.” असेदेखील स्पष्ट केले.


Edited By : Abhijeet Jadhav

First Published on: May 6, 2024 8:08 PM
Exit mobile version