Uddhav Thackeray : बाळासाहेब नाहीत, हल्ला करायची…; ठाकरेंकडून अमित शहांच्या बैठकीबाबत खुलासा

Uddhav Thackeray : बाळासाहेब नाहीत, हल्ला करायची…; ठाकरेंकडून अमित शहांच्या बैठकीबाबत खुलासा

मुंबई : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करत मोठा गौप्यस्फोट केला होता. अमित शाह यांनी अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता. त्याचवेळी फडणवीसांनी आदित्यला मुख्यमंत्री करून दिल्लीला जाणार असं म्हटलं होतं. मात्र उद्धव ठाकरेंच्या या दाव्यावर आमचे जुने मित्र उद्धव ठाकरे हे भ्रमिष्ट झाले आहेत, असा पलटवार फडणवीसांनी केला. यानंतर आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी बंद दाराआड झालेल्या चर्चेबाबत मोठा खुलासा केला आहे. (Lok Sabha Election 2024 Another revelation from Uddhav Thackeray regarding the meeting with Amit Shah)

‘द इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्रीपदाबाबतचा शब्द पाळला नसल्याचा आरोप केला आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री करेन, असे वचन मी माझ्या वडिलांना दिले होते. त्यानुसार, प्रत्येकी 2.5 वर्षे शिवसेना आणि भाजपाचा मुख्यमंत्री असेल, याबद्दल अमित शहा यांच्यासमवेत सहमती झाली होती. याशिवाय देवेंद्र फडणवीसही म्हणाले होते की, आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवेन आणि मी स्वतः दिल्लीला जाईन. पण फडणवीस यांनी मला माझ्याच लोकांसमोर खोटे ठरवले, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला होता. मात्र आज अमरावती येथील जाहीरसभेत उद्धव ठाकरेंच्या दाव्यावर प्रत्युत्तर देताना फडणवीस यांनी ठाकरे यांची घराणेशाही असल्याकडे लक्ष वेधले आहे.

हेही वाचा – Uddhav Thackeray : बाळासाहेब नाहीत, हल्ला करायची…; ठाकरेंकडून अमित शहांच्या बैठकीबाबत खुलासा

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमचे जुने मित्र भ्रमिष्ट झाले आहेत, असे मला वाटते. बंद खोलीत अमित शहा यांनी आपल्याला मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला होता, असे ते आतापर्यंत सांगत होते. तर आता, मी आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री बनविण्याचा शब्द दिला होता, असे ते सांगत आहेत. त्यांना वेड लागले असेल, पण मला तर लागले नाही ना. मी फक्त आदित्य ठाकरे यांना ट्रेनिंग देण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचा सल्ला दिला होता. त्यांना मुख्यमंत्री काय, केवळ मंत्री करण्याचाही विचार त्यावेळी नव्हता. खरं तर उद्धव ठाकरे यांना कालपर्यंत भ्रम होता की, अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याचा शब्द दिला होता. तर, आज ते सांगत आहेत की, फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करून आपण स्वत: दिल्लीला जात असल्याचे म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांनी आधी ठरवावे की अमित शहा यांनी शब्द दिला की देवेंद्र फडणवीस यांनी. उद्धव ठाकरे यांनी मी मुख्यमंत्री होईन किंवा माझा मुलगा मुख्यमंत्री होईल, असा केवळ आपल्या परिवाराचाच विचार केला, असा पलटवार देवेंद्र फडणवीस यांनी केला. मात्र उद्धव ठाकरे यांनी आता देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपावर निशाणा साधला आहे.

भाजपाला वाटलं हल्ला करायची हीच वेळ (BJP thought now is the time to attack if there is no Balasaheb)

मुंबईतील सभेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, 2014 मध्ये मोदी पंतप्रधान झाल्यावर स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटलं. पण अमित शहा भाजपाचे अध्यक्ष झाले आणि त्यांची चालच बदलली. 2014 च्या निवडणुकीआधी त्यांनी मला विचारलं की सर्व्हे केला आहे का? मी म्हटलं आम्ही लढणारी माणसं आहोत, सर्व्हे करत नाहीत. शिवाजी महाराजांनी सर्व्हे केला नव्हता. जर सर्व्हेत तुमचा पराभव दाखवला तर तुम्ही लढणंच सोडून देता का? सुरुवातीला त्यांनी प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी वाटाघाटी करण्यासाठी यायचे. तेव्हा जागांची चढाओढ व्हायची. पण आता उर्मटपणा व आकड्यांचा वापर सुरू केला आहे. त्यांनी राजस्थानमधील भाजपा नेते ओम माथूर यांना आमच्याशी चर्चा करायला पाठवलं. भाजपाला वाटलं आता बाळासाहेब नाहीत, तर हल्ला करायची हीच वेळ आहे. वापरा आणि फेकून द्या ही त्यांची गॅरंटी आहे. तेच भाजपानं 2019मध्ये माझ्यासोबत केलं, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला.

हेही वाचा – Pawar VS Pawar : शेवटच्या सभेत डोळ्यांतून अश्रूही येतील; अजितदादांचा शरद पवारांवर निशाणा

Edited By – Rohit Patil

First Published on: April 20, 2024 9:17 PM
Exit mobile version