BJP VS Congress : संविधान बदलणाऱ्या काँग्रेसचाच भाजपाविरोधात अपप्रचार; विनोद तावडेंची टीका

BJP VS Congress : संविधान बदलणाऱ्या काँग्रेसचाच भाजपाविरोधात अपप्रचार; विनोद तावडेंची टीका

मुंबई : गोव्यातील काँग्रेस उमेदवाराने गोव्यात भारतीय संविधान लागू करू नये, अशी मागणी केली आहे. तर कर्नाटकातील एका काँग्रेस नेत्याने अशीच मागणी काही दिवसांपूर्वी केली होती. यावरून काँग्रेसलाच संविधानाविषयी आदर नसल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी टीका भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी आज पत्रकार परिषदेत केली. काँग्रेसने त्यांच्या सत्ताकाळात संविधानात 80 वेळा बदल केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा यांच्यावर टीका करण्यासारखे काहीच उरले नसल्याने काँग्रेस नेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे हे संविधान बदलासाठी भाजपाला 400 पेक्षा अधिक जागा हव्या असल्याचा अपप्रचार करत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. (Lok Sabha Election 2024 Congress which is changing the constitution is spreading propaganda against BJP)

मोदी सरकारच्या कार्यकाळात संविधान दिवस साजरा केला जाऊ लागला. भाजपाचे संकल्पपत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी प्रसिद्ध झाले. यावरून भाजपचा डॉ. आंबेडकर आणि संविधानाबद्दलचा आदर स्पष्ट झाला असल्याचे तावडे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. गोव्यातील काँग्रेस उमेदवाराने गोवा राज्याला भारतीय संविधान लागू करू नये, अशी मागणी जाहीरपणे केली आहे. राहुल गांधी यांच्या अनुमतीनेच आपण ही मागणी करत असल्याचे  या उमेदवाराने सांगितले आहे. यावरून काँग्रेसला संविधानाचा आदर करण्याची इच्छा नाही हेच स्पष्ट झाले आहे, असे तावडे म्हणाले. यावेळी त्यांनी राज्यातील प्रचाराच्या घसरलेल्या पातळीबाबत चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, बाळासाहेब ठाकरे, विलासराव देशमुख, शरद पवार हे नेतेही परस्परांवर टीका करत असत. मात्र त्यावेळी प्रचाराची पातळी घसरत नव्हती.

हेही वाचा – Lok Sabha : अजितदादा मुलाच्या पराभवाचा बदला घेणार नसतील, पण…; रोहित पवारांकडून डिवचण्याचा प्रयत्न

मोदी सरकारच्या गेल्या 10 वर्षाच्या कार्यकाळात महाराष्ट्राला भरभरून मिळाले आहे. ‘युपीए’ सरकारच्या तुलनेत केंद्राकडून महाराष्ट्राला मिळालेल्या अनुदानात 253 टक्क्यांनी वाढ झाली आहे. करांच्या परताव्यापोटी मिळणाऱ्या रकमेत 33 टक्के वाढ झाली असून सन 2021-21  पासून 11 हजार 711 कोटी एवढे बिनव्याजी कर्ज मिळाले. राज्यात शहरी आणि ग्रामीण भागात 27 लाख घरे पंतप्रधान आवास योजनेखाली बांधली गेली. अशा अनेक गोष्टींचा विचार करून मतदार भाजपा आणि महायुतीला भरभरून मतदान करतील, असा विश्वासही विनोद तावडे यांनी यावेळी व्यक्त केला.

हेही वाचा – Bacchu Kadu : हनुमानाने…; अमित शहांच्या सभेचा मंडप कोसळल्याने बच्चू कडूंची खोचक टीका

Edited By – Rohit Patil

First Published on: April 23, 2024 7:58 PM
Exit mobile version