Lok Sabha 2024 : मोदी पॉर्न उमेदवाराबद्दल का नाही बोलत? ठाकरे गटाचे भाजपाला सडेतोड उत्तर

Lok Sabha 2024 : मोदी पॉर्न उमेदवाराबद्दल का नाही बोलत? ठाकरे गटाचे भाजपाला सडेतोड उत्तर

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असतानाच जाहिरातीच्या माध्यमातून प्रचारावर जोर देताना दिसत आहेत. ठाकरे गटाने सरकारच्या कारभारावर टीका करताना महिला अत्याचारावर प्रश्न उपस्थित केला आहे. मात्र या जाहिरातीवर भाजपाने आक्षेप घेतला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या जाहिरातीत पॉर्न स्टारचा समावेश असल्याचा आरोप भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. याचपार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. (Lok Sabha Election 2024 Narendra Modi not talking about the porn candidate Thackeray Group BJP Priyanka Chaturvedi Chitra Wagh)

माध्यामांशी बोलताना प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या की, आमच्या जाहिरातीतील कलाकारावर भाजपाकडून प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. पण या लोकांनी जो पॉर्न उमेदवार उभा केला आहे, ज्याने हजारे महिलांचे लैंगिक शोषण केले आहे. त्याने त्याच्या घरातील महिलांना सोडलं नाही. घरामध्ये काम करणाऱ्या वृद्ध महिलांना सोडलं नाही. त्याबद्दल याचं काय मत आहे. भाजपावाले जे आरोप करत आहेत, त्यांना विचारा पंतप्रधान नरेंद्र मोदी माता आणि भगिनींबद्दल बोलतात, पण ते प्रज्वल रेवण्णा बद्दल का नाही बोलत. अडीच हजारांवर अश्लिल व्हिडीओ क्लिप प्रज्वल रेवण्णा याच्या फोनमध्ये मिळाल्या आहेत. तो व्यक्ती कर्नाटकातील हसन येथून भाजपासोबत निवडणूक लढवत आहे. त्या व्यक्तीला भारताबाहेर पाठवण्याचे काम या लोकांनी केलं असून तो आता फ्रान्समध्ये मजा करत आहे आणि हे लोक आम्हाला प्रश्न विचारत आहेत, असे प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटले.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : …हे दृश्य महाराष्ट्राला याचि देही याचि डोळा पाहायचे आहे, ठाकरे गटाची खोचक टीका

चित्रा वाघ यांनी काय आरोप केले?

दरम्यान, पत्रकार परिषदेत बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या की, शिवसेना उबाठा गटाने महिला अत्याचाराच्या संबंधी एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीमधील कलाकार हा पॉर्न स्टार आहे. तोच या जाहिरातीमध्ये विचारतो की महिलांवरचे अत्याचार कधी थांबणार? हा माणूस लहान वयाच्या मुलींसोबत अश्लील चित्रीकरण करतो. या जाहिरातीत वडिलांच्या भूमिकेत जी व्यक्ती आहे, त्याचे उल्लू ॲपवरील एका वेबसीरिजमध्ये नको ते कृत्य करतानाचे व्हिडीओ आणि क्लिप्स आहेत. अशा माणसाला घेऊन ठाकरे गटाने महिला अत्याचारावरची जाहिरात कशी केली? छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये ठाकरे गट कसली संस्कृती आणायचा प्रयत्न करत आहे? असे बाप जाहिरातीमध्ये वापरून ठाकरे गट बाप असल्याचं महाराष्ट्राला दाखवणार आहे का? ठाकरे गटाला पॉप, पार्टी आणि पॉर्नची संस्कृती रुजवायची आहे का? ठाकरे गटाला जाहिरातीसाठी दुसरा कलाकार मिळाला नाही का? जाहिरात तयार करणारी कंपनी आणि ठाकरे यांचा काही संबंध आहे का? त्याबद्दल आम्हाला उद्धव ठाकरेंना जाब विचारायचा आहे, असे टीकास्त्र चित्रा वाघ यांनी सोडले.

हेही वाचा – Sanjay Raut : निवडणूक आयोग हा मोदी-शहांच्या पकडीमध्ये गुदमरलाय; संजय राऊतांची टीका

Edited By – Rohit Patil

First Published on: May 2, 2024 1:41 PM
Exit mobile version