Lok Sabha 2024 : सध्या त्या दिल्या भाकरीच्या आणि…, सुषमा अंधारेंचा चित्रा वाघांवर पलटवार

Lok Sabha 2024 : सध्या त्या दिल्या भाकरीच्या आणि…, सुषमा अंधारेंचा चित्रा वाघांवर पलटवार

मुंबई : लोकसभा निवडणुकच्या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधकांदरम्यान आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडू लागला आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जाहिरातीवर टीका केली आहे. तर, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी लगेचच ट्वीट करत चित्रा वाघ यांच्यावर पलटवार केला आहे. (Lok Sabha Election 2024: Sushma Andhare’s attack on Chitra Wagh over advertisement issue)

ठाकरे गटाने मोदी सरकारच्या कारभारावर टीका करताना महिला अत्याचारावर प्रश्न उपस्थित केला आहे. यासंबंधीच्या जाहिरातीवर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी आक्षेप घेतला आहे. या जाहिरातीमधील कलाकार हा पॉर्न स्टार आहे. लहान वयाच्या मुलींसोबत अश्लील चित्रीकरण करणारी ही व्यक्ती या जाहिरातीमध्ये विचारते की, महिलांवरचे अत्याचार कधी थांबणार? अशा माणसाला घेऊन ठाकरे गटाने महिला अत्याचारावरची जाहिरात कशी केली? या जाहिरातीमधील कलाकारामुळे महाराष्ट्रातील महिलांची मान शरमेने झुकली आहे, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये ठाकरे गट कसली संस्कृती आणायचा प्रयत्न करत आहे? आदूबाळने (आमदार आदित्य ठाकरे) याआधीच नाइट लाइफसाठी आग्रह धरला होता. आता, त्यांना पॉप, पार्टी आणि पॉर्नची संस्कृती रुजवायची आहे का? असा सवालही त्यांनी केला आहे. एक पॉर्न स्टार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जाहिरातीमध्ये झळकतो. ठाकरे गटाला जाहिरातीसाठी दुसरा कलाकार मिळाला नाही का? उद्धव ठाकरे यांनी याचे उत्तर महाराष्ट्रातील जनतेला दिले पाहिजे, तसेच याचा तपास व्हायला पाहिजे, असेही चित्रा वाघ यांनी म्हणाल्या.

याला सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आक्रस्ताळ्याबाई (चित्रा वाघ) सवयीप्रमाणे बडबडून गेल्या. पण 3000हून जास्त सेक्स व्हिडीओ व्हायरल झालेल्या प्रज्वल रेवना किंवा मुलुंडचे एचडी व्हिडिओवाल्याबद्दल (ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या) त्या अळीमिळी गुपचिळी करून बसल्या आहेत. त्यांची काही चूक नाही, सध्या त्या दिल्या भाकरीच्या आणि सांगितल्या चाकरीच्या आहेत, असा पलटवार त्यांनी केला आहे.

हेही वाचा – Chitra Wagh : ठाकरे गटाला पॉप, पार्टी आणि पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा सवाल


Edited by Manoj S. Joshi

First Published on: May 2, 2024 1:44 PM
Exit mobile version