Maharashtra Assembly Winter Session 2021: १२ आमदारांचे निलंबन मागे घेण्याचे संकेत – अनिल परब

Maharashtra Assembly Winter Session 2021:  १२ आमदारांचे निलंबन मागे घेण्याचे संकेत – अनिल परब

विधानसभा अध्यक्षांच्या निवडीचा कार्यक्रम ठरत असताना  निलंबित केलेल्या १२ आमदारांचे निलंबन केव्हा मागे घेणार? सा सवाल करीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि  माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. त्यावर अध्यक्षदाच्या निवडीचा जेव्हा अधिकृत कार्यक्रम जाहीर होईल तेव्हा त्याची घोषणा केली जाईल, असे स्पष्ट  संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी भाजपच्या आमदारांचे निलंबन मागे घेण्याचे संकेत दिले.

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी आज निलंबित १२ आमदारांच्या मुद्यावर निवेदन केले. यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी अध्यक्ष निवडीच्या कार्यक्रमाविषयी सभागृहाबाहेर होत असलेल्या चर्चेचा दाखला देत संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांच्यावर निशाणा साधला. मुनगंटीवार म्हणाले की, अधिवेशन सुरु असताना अध्यक्ष पदाची निवडणूक होणार असल्याची बातमी आम्हाला सभागृहाबाहेरून ऐकायला मिळते. मात्र सभागृहात याविषयी अधिकृत माहिती मिळत नाही. सभागृहातील १२ आमदार निलंबित असताना त्यांचा विचार न करता अध्यक्षपदाची थेट निवडणूक घेतली जाते. अध्यक्षपदाची निवडणूक घ्यायचीच असेल तर आधी १२ आमदारांचे निलंबन मागे घ्यायला हवे.या प्रकरणी आपण परब यांच्यावर हक्कभंग आणणार असल्याचा इशाराही मुनगंटीवार यांनी दिला.

देवेंद्र फडणवीस यांनीही सभागृहात १२  आमदारांच्या निलंबनाचा मुद्दा छेडला. अध्यक्षपदाची निवडणुक होणार असेल तर आमदारांचे निलंबन कधी मागे घेणार?असा सवाल त्यांनी ला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार या आमदारांनी विधानसभा उपाध्यक्षांकडे निलंबन मागे घेण्यासाठी पत्र दिले आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांची निवड होण्यापूर्वी याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी  केली.

यावर विधानसभा  अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम विधानसभेत जाहीर केला जातो.विधानसभेचे कामकाज सुरू असून अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात येईल. सध्या अध्यक्षपदाबाबत अशी कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे जेव्हा याबाबतचा अधिकृत कार्यक्रम जाहीर होईल तेव्हा त्यासंदर्भात घोषणा केली जाईल, असे स्पष्टीकरण देत परब यांनी या वादावर पडला टाकला.


हेही वाचा –

First Published on: December 24, 2021 8:55 PM
Exit mobile version