तर लसीकरण केंद्रे Covid-19 प्रसारक मंडळे होतील – मुख्यमंत्री

तर लसीकरण केंद्रे Covid-19 प्रसारक मंडळे होतील – मुख्यमंत्री

तरूणांसाठी म्हणजे १८ ते ४४ वयोगटासाठी १ मे पासून कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण सुरू होत आहे. पण तरूण म्हणजे उत्साह. आपण राज्य सरकार म्हणून लसीकरणासाठीची सोय करतो आहोत. पण लसीकरण केंद्रावर गोंधळ, गर्दी करू नका. अन्यथा ही लसीकरण केंद्रे ही कोरोना प्रसारक मंडळे होतील अशी भीती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. राज्यातील जनतेशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधताना त्यांनी ही चिंता व्यक्त केली.  आजवर जो संयम दाखवला तो लसीकरणाच्या निमित्तानेही दाखवा अशी विनंती त्यांनी यावेळी केली. ज्यांची लसीकरणासाठी नोंदणी झाली आहे, त्यांना मॅसेज मिळेल आणि कोणत्या केंद्रावर जायचे आहे याचीही माहिती मिळेल. त्यामुळे लसीकरण केंद्रावर अनावश्यक गर्दी करू नका असेही आवाहन त्यांनी केले. आपण लसीकरणासाठी पुर्ण तयारी केली आहे. राज्यातील नागरिकांना लसीकरणासाठीची महाराष्ट्राची तयारी पुर्ण झाली आहे, असे सांगतानाच त्यांनी जास्तीत जास्त केंद्राचा लसींचा कोटा मिळावा अशीही विनंती यावेळी केली.

राज्यात महाराष्ट्राची नागरिकांना लसीकरणाची दिवसाला १० लाख लोकांचे लसीकरण करण्याची क्षमता आहे. त्यामुळेच केंद्राकडून मदत मिळणे अतिशय गरजेचे आहे असे मुख्यमंत्री म्हणाले. राज्यातील जनतेसाठी कोरोना लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना महाराष्ट्र सरकारची एक रकमी चेक देण्याची महाराष्ट्र सरकारची तयारी आहे. पण सध्या मिळणारा ३ लाख डोसचा कोटा अतिशय तोकडा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्राने एकाच दिवसात ५.५ लाख लोकांचे लसीकरण करण्याचा देशात उच्चांक केला आहे. राज्यातील नागरिकांसाठी लस खरेदी करण्यासाठी लस निर्मिती कंपन्यासोबतही आम्ही चर्चा करत आहोत. पण भारतात लस निर्मिती करणाऱ्या दोन कंपन्यांनी अवघ्या १८ लाख डोस महाराष्ट्राला देण्याची तयारी दर्शवली आहे. दिवसाला ३ लाख डोसचा कोटा केंद्राने म्हणूनच वाढवायला हवा असे मुख्यमंत्री म्हणाले.

१८ ते ४४ वयोगटासाठी जेव्हा नोंदणी सुरू झाली तेव्हा कोविन एप क्रॅश झाले. अशा प्रकारच्या घटना होऊ नयेत म्हणूनही केंद्राला विनंती केली असल्याचे त्यांनी सांगितले. जोवर गोष्टी सुरळीत होत नाहीत तोवर राज्यातील नागरिकांनी संयम दाखवावा असेही ते म्हणाले. येत्या १ मे पासून १८ वर्षांच्या नागरिकांना कोरोनाची पहिली लस दिली जाणार आहे. पण ही शेवटची लस नाही असेही ते म्हणाले. राज्य सरकार म्हणून राज्यातील सर्व नागरिकांच्या लसीकरणाची आपली तयारी आहे असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

First Published on: April 30, 2021 9:33 PM
Exit mobile version