Maharashtra Corona Update: नव्या रुग्णांच्या संख्येत वाढ; १७१ जणांचा मृत्यू

Maharashtra Corona Update: नव्या रुग्णांच्या संख्येत वाढ; १७१ जणांचा मृत्यू

Maharashtra Corona Update : राज्यात कोरोना पुन्हा फोफावतोय, २४ तासात १ हजार ४९४ कोरोनाबाधितांची नोंद

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार सुरूच आहे. सोमवारी रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे पाहायला मिळाले होते. परंतु, मंगळवारी कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा वाढला. सोमवारी ६ हजार ७४० नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले होते. मंगळवारी यात वाढ होऊन ८ हजार ४१८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे आता एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६१ लाख १३ हजार ३३५ झाली असून अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख १४ हजार २९७ इतकी झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,२९,०८,२८८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६१,१३,३३५ (१४.२५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,३८,८३२ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये असून ४४४७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मृतांचा आकडाही वाढला  

सोमवारी कोरोनाबाधित मृतांची संख्या शंभरच्याही खाली आली होती. मंगळवारी मात्र त्यात पुन्हा वाढ झाली. आज १७१ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. आज नोंद झालेल्या एकूण १७१ मृत्यूंपैकी १२७ मृत्यू हे मागील ४८ तासातील, तर ४४ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. राज्यात आतापर्यंत १ लाख २३ हजार ५३१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०२ टक्के एवढा आहे.

१० हजार ५४८ रुग्ण बरे 

मंगळवारी कोरोनाबाधितांचा आणि मृतांचा आकडा वाढला. तसेच चिंताजनक बाब म्हणजे बरे झालेल्या रुग्णांची संख्या कमी झाली. आज १० हजार ५४८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ५८,७२,२६८ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.०६ टक्के एवढे झाले आहे.

First Published on: July 6, 2021 8:53 PM
Exit mobile version