Students Agitation: ‘हिंदुस्तानी भाऊ’ला तीन दिवसांची पोलीस कोठडी

Students Agitation: ‘हिंदुस्तानी भाऊ’ला तीन दिवसांची पोलीस कोठडी

Students Agitation: 'हिंदुस्तानी भाऊ'ला तीन दिवसांची पोलीस कोठडी

धारावी परिसरात दहावी, बारावीच्या परीक्षांविरोधात विद्यार्थ्यांना चिथवल्याप्रकरणी हिंदुस्तानी भाऊ उर्फ विकास पाठकला वांद्रे कोर्टाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करत आज सकाळी हिंदुस्तानी भाऊला धारावी पोलिसांनी अटक केली होती. या अटकेनंतर त्याला दुपारी वांद्रे कार्टात हजर करण्यात आले. यावेळी कोर्टाने विद्यार्थ्यांना चिथवण्याच्या आरोपीखाली हिंदुस्तानी भाऊला ही शिक्षा सुनावली आहे. हिंदुस्तानी भाऊसोबत धारावी पोलिसांनी आणखी एका आरोपीविरोधात कारवाई केली आहे.

31 जानेवारी रोजी धारावी परिसरात ऑनलाईन परीक्षेविरोधात हजारोंच्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. या विद्यार्थ्यांना भडकवल्याचा आरोप हिंदुस्तानी भाऊवर आहे. कारण विद्यार्थ्यांच्या आंदोलनास्थळी हिंदुस्तानी भाऊ उपस्थित होता. यासंदर्भातील एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला. यात विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षा देण्याची सक्ती का केली जातेय असा सवाल हिंदुस्तानी भाऊने केला होता. यानंतर पोलिसांनी त्याच्यावर अटकेची कारवाई केली. मात्र या आंदोलनानंतर हिंदुस्तानी भाऊने बिनशर्त माफी मागितली. तसेच विद्यार्थ्यांना न्याय मिळावा हा आंदोलनामागचा हेतू होता असं त्याने स्पष्ट केले.

दरम्यान मुंबईसह नागपूर, अकोला, औरंगाबाद, पुणे आणि उस्माबानाबादमध्येही दहावी, बारावीच्या परीक्षांविरोधात विद्यार्थ्यांचा आक्रोश पाहायला मिळाला. विद्यार्थ्यांनी बस आणि इतर वाहनांच्या तोडफोड करत निषेध व्यक्त केला. यावेळी विद्यार्थ्यांची गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज केला. दरम्यान मुंबईतील धारावी परिसरातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनासाठी हिंदुस्तानी भाऊला जबाबदार धरण्यात आले आहे. दंगल, महाराष्ट्र पोलीस कायदा, आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि महाराष्ट्र प्रिव्हेंशन ऑफ डिफेसमेंट ऑफ प्रॉपर्टी अॅक्ट या अंतर्गत हिंदुस्तानी भाऊ विरोधात गुन्हा दाखल केला आहे.


Student Agitation: विद्यार्थ्यांना चिथवणाऱ्या हिंदुस्तानी भाऊसह एकाला धारावी पोलिसांकडून अटक


 

First Published on: February 1, 2022 2:56 PM
Exit mobile version