Maharashtra Unlock: एका अटीमुळे मुंबईतील मॉल्स अद्यापही बंदच!

Maharashtra Unlock: एका अटीमुळे मुंबईतील मॉल्स अद्यापही बंदच!

संग्रहित छायाचित्र

राज्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्यामुळे ब्रेक द चेन अंतर्गत ठाकरे सरकारने कोरोना निर्बंधात शिथिलता दिली. मॉल्स आणि शॉपिंग सेंटर रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली. मात्र राज्य सरकारच्या एका अटीमुळे मुंबईतील मॉल्स आणि शॉपिंग सेंटर अद्यापही बंदच आहे. कारण मॉल्स आणि शॉपिंग सेंटर सुरू करण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लशीचे दोन डोस आणि दुसरा डोस घेऊन १४ दिवस पूर्ण होणे आवश्यक आहे. याच एका अटीमुळे मुंबईतील बरेच मॉल्स आणि शॉपिंग सेंटर खुले होऊ शकले नाही आहेत.

राज्य सरकाराने मॉल्स आणि शॉपिंग सेंटर सुरू करण्यासाठी घातलेली ही अट शिथिल करण्याची मागणी आता कर्मचारी वर्ग करत आहेत. कारण मॉल्स आणि शॉपिंग सेंटरमध्ये असलेल्या ९० टक्के कर्मचाऱ्यांचे वय ४५ वर्षांपेक्षा कमी आहे. यामुळे राज्य सरकारची परवानगी असूनही मुंबईतील मॉल्स आणि शॉपिंग सेंटर बंदच ठेवण्याची परिस्थिती ओढावली आहे. काही मॉल्स सुरू असले तरी त्यामधली दुकाने अजूनही बंदच आहेत.

१५ ऑगस्टपासून मॉल्स आणि शॉपिंग सेंटर सुरू करण्याची परवानगी देण्यात आली. मात्र दोनच दिवसात अत्यल्प कर्मचाऱ्यांमुळे मॉल्स बंद करण्याची वेळ आली आहे. रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडियाने मॉल्स आणि शॉपिंग सेंटर सुरू करण्यासाठी दिलेल्या अटीचा राज्य सरकारने पुनर्विचार करावा, अशी मागणी केली आहे. कारण मॉल्स आणि शॉपिंग सेंटर्स ही महत्त्वाची आर्थिक केंद्र आहेत.


हेही वाचा – मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण २ वर, दीड वर्षात सर्वात कमी मृत्यू दर


 

First Published on: August 18, 2021 9:10 AM
Exit mobile version