हे तर शरजील उस्मानीचे सरकार

हे तर शरजील उस्मानीचे सरकार

Cyclone Tauktae: वादळाचे अलर्ट असून NDRF टीम तैनात का नव्हत्या, फडणवीसांचा सवाल

अलिगढ मुस्लीम विद्यापीठातील माजी विद्यार्थी नेता शरजील उस्मानी याला राज्य सरकार वाचवत आहे. वादग्रस्त वक्तव्य करूनही त्याच्या विरोधात कारवाई होत नाही, हे सरकारच शरजीलचे आहे, असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे महाविकास आघाडी सरकारवर केला. सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी करण्याच्या आघाडी सरकारच्या घोषणेचीही फडणवीस यांनी चिरफाड केली.

मुंबईतील प्रदेश भाजपच्या मुख्यालयात देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद झाली. शरजील उस्मानी आणि सेलिब्रिटींच्या ट्विटवर विचारता त्यांनी शरजीलचे संरक्षण करण्यात सरकार मश्गूल असल्याने त्याला अटक केली जात नाही. पण त्याला अटक व्हावी म्हणून आंदोलन करणार्‍या भाजपच्या कार्यकर्त्यांना घरात जाऊन ताब्यात घेतले जात आहे. आघाडीचे हे सरकार शरजीलचे आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला. सरकारकडून त्याला संरक्षण दिले जात आहे, असे आम्ही म्हणालो तर चुकले काय?, अशी विचारणा फडणवीस यांनी केली.

सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी करण्याच्या गृहमंत्र्यांच्या निर्णयावर फडणवीस यांनी टीकेची झोड उठवली. ज्यांनी चौकशीची मागणी केली आणि ज्यांनी मागणी मंजूर केली त्या दोघांचेही मानसिक संतुलन बरोबर नाही. त्याची तपासणी झाली पाहिजे. चौकशी तर त्यांच्या मानसिक संतुलनाची व्हायला हवी. कारण भारताच्या सार्वभौमत्वाशी छेडछेड सहन केली जाणार नाही, असे ट्विट आहे. भारताच्या अखंडतेवर हल्ला होऊ देणार नाही, असे म्हणणे चुकीचे असेल तर आपल्या सगळ्यांना सरकारने अटक करावे, अशी टीका फडणवीस यांनी केली.

विधानसभेच्या अध्यक्षांची निवड एकमताने केली जाण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. विधानसभेत विरोधकांना वागणूक कशी मिळते यावर या परंपरा टिकतात. सरकारची भूमिका काय आहे, सरकारचा विरोधकांशी संवाद कसा आहे, यावर हे अवलंबून असते. यामुळे नव्या अध्यक्ष निवडीबाबत मित्रांसोबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

First Published on: February 11, 2021 4:00 AM
Exit mobile version